शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाचे भाव घसरले; शेतकरी हतबल

By admin | Updated: June 16, 2014 23:40 IST

लोकसभा निवडणूक संपताच शेतमालाचे भाव वाढणार अशी आशा शेतकरी वर्गाला होती. मात्र सोयाबीन कपाशी, चणा, तूर आदी पिकांचे भाव गत काही दिवसात कोसळले आहे. पेरणीच्या तोंडावर असे झाल्याने

वायगाव(नि.) : लोकसभा निवडणूक संपताच शेतमालाचे भाव वाढणार अशी आशा शेतकरी वर्गाला होती. मात्र सोयाबीन कपाशी, चणा, तूर आदी पिकांचे भाव गत काही दिवसात कोसळले आहे. पेरणीच्या तोंडावर असे झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. आधारभूत किंमती पेक्षाही कमी भावात खरेदी केली जात असल्याने नुकसान होत आहे.केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमीदराच्या वर शेतमालाची खरेदी करणे बंधनकारक आहे. पण सर्वत्र शेतमालाचे भाव कोसळले असून ते आधारभूत किंमतीच्या खाली आले आहे. अवकाळी पावसाने शेतमालावर चांगलाच मार बसला. सोयाबीन अत्यल्प भावाने विकावे लागले. मार्च महिना संपताच सोयाबीनचे भाव झपाट्याने वाढले. ४ हजार ८०० रुपये क्विंटल पर्यंत ते पोहचले. लोकसभा निवडणुकीपर्यंत ते स्थित होते. निवडणूक संपताच ते घसरत ३ हजार ९०० ते ४ हजार पर्यंत कोसळले. पेरणीसाठी सोयाबीन घ्यायला गेल्यास शासकीय कंपनीची ३० किलोची बॅग घेण्यासाठी अंदाजे २ हजार ३०० रुपये मोजावे लागते. त्याचप्रमाणे तूर निवडणुकीदरम्यान ५ हजार रुपयांपर्यंत पोहचले होते. निवडणूक संपताच ते ३ हजार ते ३ हजार ८०० रुपये क्विंटल पर्यंत घसरले. लागवडीसाठी तूर खरेदी करताना मात्र प्रती किलो १२० ते १३० रुपये भावाने विकत घ्यावे लागत आहे. गत वर्षी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने व शासनाने चन्याची आधार भूत किंमत ३ हजार १०० रुपये केल्याने चण्याचा पेऱ्यात शेतकऱ्यांनी वाढ केली. निवडणुकीदरम्यान चना २ हजार ८०० ते ३ हजार १०० रुपयापर्यंत पोहचला निवडणूक संपताच चण्याचे भाव चांगलेच घसरून ते १ हजार ८०० ते २ हजार ३०० पर्यंत येऊन पोहचले. तसेच कापूस निवडणुकीच्या आधी ५ हजार ४०० रुपये होता. निवडणूक संपताच कापसाची किंमत ३ हजार ५०० ते ४ हजार २०० रुपयांपर्यंत येऊन पडली. वखरणी, डवरणी, तसेच बियाणे, खत व मजुरीचे दर गगणाला भिडले आहे. त्यात नैसर्गिक आपत्तीला तोड देता देता शेतकरी पुरता दमून गेला. नवा गडी नवा राज यामुळे नव्याने शासन बसल्यावर शेतमालाचे भाव वाढतील अशी आशा शेतकरी वर्गाला होती. आपले अच्छे दिन येतील असे त्याला वाटत होते. पण तसे झाले नाही. देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी पूर्णत: हालावला गेला आहे. निवडणुकीच्या आधी सर्वपक्षीय नेते शेतकऱ्यांचे हित असल्याचा दावा करीत होते. पण निवडणूक संपताच त्यांचे शब्द हवेत विरले आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. पण मशागतीला लावण्यासाठी त्याच्याकडे पैसा नाही. बँका कर्जपुरवठा करण्यास तयार नाही. त्यामुळे पैसा कसा आणि कुठून तयार करावा असा प्रश्न त्याला पडला आहे. त्यातच शेतमालाचे भाव घसरल्याने शेतकरी हतबल झाला आहे.(वार्ताहर)