वर्ध्याच्या बाजारपेठेत ५०० अन १०० च्या बनावट नोटा; बँकेतील मशीनने केली पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 13:01 IST2026-02-09T12:58:34+5:302026-02-09T13:01:59+5:30
Wardha : आर्वी शहरातील बाजारपेठेत ५०० आणि १००च्या बनावट नोटा आढळल्याने खळबळ उडाली आहे. येथील अगरबत्ती व्यावसायिकाला वसुलीत या नोटा देण्यात आल्या होत्या.

Fake 500 and 100 rupee notes found in Wardha market; Bank machine detects them
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी (वर्धा) : आर्वी शहरातील बाजारपेठेत ५०० आणि १००च्या बनावट नोटा आढळल्याने खळबळ उडाली आहे. येथील अगरबत्ती व्यावसायिकाला वसुलीत या नोटा देण्यात आल्या होत्या.
अभिजित भिवगडे यांनी शनिवारी बाजारपेठेत दहा हजारांच्या अगरबत्तीची उधारी वसुली केली. त्यात एका दुकानदाराने ५०० रुपयांची बनावट नोट दिली. भिवगडे यांनी बँकेत भरणा करण्यासाठी मशीनमध्ये १४ हजार ५०० रुपये टाकले. मात्र, मशीनने पाच वेळा ५०० ची एक नोट बाहेर फेकली. त्यावरून ती बनावट असल्याचे पडताळणीत आढळले.
"बाजारात एका व्यावसायिकाने उधारी वसूल करताना पाचशेची नोट दिली. बँकेत भरणा केला असताना ती बनावट असल्याचे आढळले. बँकेने ती नोट बनावट असल्याने त्यावर लाल क्रॉस मारली. त्यात माझे पाचशे रुपयांचे नुकसान झाले."
- अभिजित भिवगडे, अगरबत्ती व्यावसायिक, आर्वी