वर्धा - वर्ध्यातील पुलगाव परिसरातील लष्करी तळावर भीषण स्फोट झाला आहे. देवळी तालुक्यातील सोनगावबाई गावाजवळ बॉम्ब निकामी करण्याच्या ठिकाणी दुर्घटना घडली आहे. पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास बॉम्ब निकामी करताना पेटी हातातून पडल्यामुळे हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडल्याच्या बातमीला नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. मृतांमध्ये एका जवानाचाही समावेश आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर 11 जण जखमी झाले आहेत. जखमींवर सावंगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या स्फोटाच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जबलपूर येथील दारुगोळा भांडारातील माल येथे निकामी करण्यासाठी आणले होते. स्फोटकं निकामी करण्याचे काम कंत्राटदाराकडून करुन घेतले जाते. त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली, अशी माहिती आहे.
Wardha Blast : वर्ध्यातील लष्करी तळावर भीषण स्फोट, 6 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 12:07 IST
Explosion in Wardha : वर्ध्यातील पुलगाव परिसरातील लष्करी तळावर भीषण स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
Wardha Blast : वर्ध्यातील लष्करी तळावर भीषण स्फोट, 6 जणांचा मृत्यू
ठळक मुद्देस्फोटकं निकामी करताना झाला स्फोटमृतांचा आकडा वाढण्याची भीतीस्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण