शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

आजही समस्यांवर गांधी विचारातूनच जातोय समाधानाचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 16:25 IST

बापूंची १५५ वी जयंती: दहा वर्षे सेवाग्रामात राहिले वास्तव्य

दिलीप चव्हाण लोकमत न्यूज नेटवर्क सेवाग्राम : सत्य, अहिंसा, शांती आणि सत्याग्रहाचे शस्त्र जगाला महात्मा गांधीजींनी दिले. त्यांचा कार्यकाळ वेगळा असला तरी आधुनिक काळातही गांधी प्रासंगिक असल्याचे दिसून येते. देशातच नव्हे, तर जगात ज्या समस्या निर्माण झाल्या त्यांच्या समाधानाचा मार्गसुद्धा त्यांच्याच विचारांतून जातो. म्हणूनच आजही गांधी विचाराशिवाय पर्याय नसल्याचे सातत्याने अभ्यासक आणि विचारवंत सांगतात. त्यांची २ ऑक्टोबरला १५५ वी जयंती असून, स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र राहिलेल्या आश्रमात अखंड सूत्रयज्ञ, सामूहिक प्रार्थना आणि विविध कार्यक्रमांतून आदरांजली वाहिली जाते. 

राष्ट्रपिता महात्मा गांधी हे अहिंसेचे उद्‌गाता म्हणून ओळखले जात असल्याने त्यांची जयंती 'जागतिक अहिंसा दिवस' म्हणून साजरी केली जाते. बापूंनी देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी सत्याची कास धरली. अहिंसेने समस्येचे समाधान होते, शांतीने मार्ग निघतो आणि कुठलीही हिंसा न करता आपल्या ध्येयावर कायम राहून सत्याचा मार्ग पत्करणाऱ्या गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीत याचा पुरेपूर उपयोग करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. यात देशवासीयांचा सहभागही उल्लेखनीय राहिला. गांधीजींच्या अहिंसक सत्याग्रहाचा प्रयोग अमेरिकेत काळ्या लोकांवरील अत्याचाराविरोधात मार्टिन ल्युथर किंग यांनी लढा उभारून यशस्वी केला, तर दक्षिण आफ्रिकेतील निग्रोसाठी नेल्सन मंडेला यांनीही हाच मार्ग निवडला. जगाच्या पाठीवर अनेक राष्ट्रे आहेत, ज्यांनी गांधीजींच्या अहिंसा आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून लढा दिला आणि यशस्वी झाले. यावरून जगातील बलाढ्य राष्ट्रसुद्धा बापूंच्या विचारांचेच अनुसरन करतात आणि आजही हाच मार्ग सर्वांसाठी योग्य नी न्यायिक असल्याचे सिद्ध झाले आहे. म्हणून व्यक्ती नसले तरीही त्यांचे विचार हे अमर असल्याचे दिसून येत आहे. 

बापूंचे एकादश व्रत मार्गदर्शकच गांधीजीच्या विचारांची सुरुवात अंतिम व्यक्त्तीच्या गरजेपासून होते. त्यामुळे अर्थव्यवस्थेत त्यांनी यांचाच विचार अगोदर केला, उत्पादनवाढीत लोकांचा विचार व्हावा. रोजगार वाढला पाहिजे, अधिक नफा यावर भर नको आणि एकाच्या हातात मालकी हक्क नको असाही आग्रह होता, पर्यावरणाचा प्रश्न गंभीर झाल्याने त्यांचे परिणामही भोगावे लागत आहेत; पण या समस्येच्या निराकरणासाठी मानवांनी आपली जीवनशैली बदलली पाहिजे, असा आग्रह बापूंचा होता. औद्योगिक क्रांती दिलासा देणारी ठरली असली तरी यातूनच चंगळपणा, उपभोग आणि पुढे प्रदूषण वाढून समस्या वाढत गेली; पण गरजा काही संपत नाही, यासाठी कमीत कमी गरजा, पर्यावरण हास न करता संवर्धन, युज अॅड थ्रो प्रवृत्ती बदलावी लागण्याची सूचनाही एकादश व्रतांतून बापूंनी केल्या आहेत.

गांधीजींचे जीवन प्रेरणादायक बापूंचे जीवन हे इतरांसाठी प्रेरणादायी, दिशादर्शक आणि मार्गदर्शक नक्कीच आहे. बापूंच्या विचारांवर आस्था दाखविणारे अभ्यासक, कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती असंख्य असल्याने 'गांधींना मरण नाहीच', अशीच त्यांची भावना आहे. सेवाग्राम येथील आश्रमाकडे लोकांचा कल वाढला असून, तो सकारात्मक संदेश देण्याचे काम करीत आहेत. नव्या पिढीने गांधीजींचा विचार मार्ग समजावून घेणे गरजेचे आहे. यासाठी गांधी संस्थांनी आणि ज्येष्ठांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. गांधी विचारच समाधानाचा मार्ग असल्याचे जनमानसातील चर्चेतून समोर येत असून, नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याची गरज आहे.

शेती, गोशाळा आश्रमाचा पाया सेवाग्राम आश्रमात गांधीजींच्या कार्य आणि विचारांची माहिती लोकांना व्हावी यासाठी मार्गदर्शिका संगीता चव्हाण, अश्विनी बघेल, दीपाली उंबरकर सेवारत आहेत. कापसापासून कापड तयार करणे या कामातून आजही पर्यटकांना बापूंच्या कार्याची ओळख होत आहे. चरखा, अंबर चरखा, विणाई यंत्र आणि त्यामागील अर्थशास्त्र यांचे ज्ञान होते. शेती आणि गोशाळा हा आश्रमाचा पाया असून, याची ओळख आश्रमातील उपक्रमातून होत आहे.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीwardha-acवर्धा