शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांनंतरही वाढीव पाणीपुरवठा योजना अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 05:00 IST

कत्राटदाराला ११ एप्रिल २०१७ मध्ये कार्यारंभ आदेश दिला. प्राकलनानुसार १८६ कि.मी.ची पाईपलाईन व ११ नवीन जलकुंभाचा समावेश असून कामाचा कालावधी २ वर्षांचा निर्धारित केला होता. पण, निर्धारित वेळेत काम होत नसल्याने कंत्राटदाराला प्रतिदिन ७७ हजार रुपये दंडाची नोटीस बजावली होती. तरीही निर्धारित कालावधीत काम पूर्ण झाले नाही.

ठळक मुद्देएक दिवसाआड पाणीपुरवठा : हिंगणघाटवासीयांना सोसावी लागतेय झळ

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहरातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी अमृत योजने अंतर्गत मंजूर झालेली ४४ कोटी ४१ लाख रुपयांची योजना निर्धारित कालावधीपेक्षा एक वर्ष जास्त होऊनही पूर्णत्वास गेली नाही. त्यामुळे यावर्षीही नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नारिकांना पाण्याची झळ सोसावी लागत आहे. त्यामुळे कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.वणा नदी काठावरील या शहरात दररोज प्रतिव्यक्तीला ९० लिटर पाणीपुरवठा करण्यासाठी शहरातील नळ योजना कमी पडत आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्याने विस्तारीत शहराची पाण्याची गरज भागविण्याकरिता अमृत योजनेंतर्गत ४४ कोटीं ४१ लाखाची पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली. कत्राटदाराला ११ एप्रिल २०१७ मध्ये कार्यारंभ आदेश दिला. प्राकलनानुसार १८६ कि.मी.ची पाईपलाईन व ११ नवीन जलकुंभाचा समावेश असून कामाचा कालावधी २ वर्षांचा निर्धारित केला होता. पण, निर्धारित वेळेत काम होत नसल्याने कंत्राटदाराला प्रतिदिन ७७ हजार रुपये दंडाची नोटीस बजावली होती. तरीही निर्धारित कालावधीत काम पूर्ण झाले नाही. आता पुन्हा एक वर्ष लोटूनही शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी मार्केट जवळील जलकुंभ, तहसील कार्यालय समोरील जलकुंभ व रामनगर वार्डातील न्यू म्युनिसिपल हायस्कूल परिसरातील जलकुंभाचे काम रखडले आहे. त्यामुळे ही वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करता येत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.जीवन प्राधिकरणचे होतेय दुर्लक्षया कामाच्या देखरेखेची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे सोपविली आहे.पण, त्यांच्या दुर्लक्षितपणामुळे कंत्राटदाराची मनमर्जी सुरु आहे. अधिकाऱ्यांकडून नियमित देखरेख ठेवण्याऐवजी नागपुरातून कारभार चालवित आहे. या ठिकाणी सुरक्षिततेला बगल दिली जात आहे. ११ डिसेंबर २०१८ ला रामनगर वार्डातील न्यू म्युनिसिपल हायस्कूल परिसरातील जलकुंभाच्या कामादरम्यान एक मजूर पडून दगावला. गेल्यावर्षी आंबेडकर चौकात पाईपलाईनकरिता खोदलेल्या ७ फूट खड्यात मोहम्मद हुसैन हसन अली अजानी हा ४ वर्षीय बालक पडला होता पण; वेळीच मदत मिळाल्याने त्याचे प्राण वाचले.अमृत योजनेअंतर्गत शहराची वाढीव पाणीपुरवठा योजना विविध कारणांमुळे निर्धारित कालावधीत पूर्णत्वास आली नाही. सद्या स्थितीत कोरोनाचा प्रादुभार्वामुळे काम बंद आहे. तरी कंत्राटदाराकडून साहित्याची जुळवाजुळव सुरु असून सोशल डिस्टन्सिंग ठेवून कामाची सुरुवात करण्यात येईल. येत्या महिन्यात उर्वरीत कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.- दिनेश तपासे, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, न.प.हिंगणघाट.

टॅग्स :Waterपाणी