शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना चाचणी न केल्यास प्रतिष्ठान राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:00 IST

आर्वी शहरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना आणि त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी केल्या शिवाय गुरूवारनंतर आपली प्रतिष्ठाने उघडता येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. संचार बंदीच्या काळात नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांनी केले आहे.

ठळक मुद्देएस.डी.ओं.चा आदेश : आर्वीत गुरूवारपर्यंत सक्तीची संचारबंदी लागू

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : कोविड बाधितांची सध्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आणि आर्वी उपविभागात अचानक कोरोना ब्लास्ट होऊ नये या हेतूला केंद्रस्थानी ठेऊन उपविभागीय न्याय दंडाधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी हरिष धार्मिक यांनी आर्वी शहर क्षेत्रात गुरूवार ३० जुलैपर्यंत सक्तीच्या संचारबंदीचा आदेश निर्गमित केला आहे. या आदेशानुसार आर्वी शहरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना आणि त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी केल्या शिवाय गुरूवारनंतर आपली प्रतिष्ठाने उघडता येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. संचार बंदीच्या काळात नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांनी केले आहे.आर्वी उपविभाग कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ पाहत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आर्वी शहराच्या क्षेत्रात गुरूवारपर्यंत सक्तीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश उपविभागीय महसूल अधिकारी हरिष धार्मिक यांनी रविवारी रात्री उशीरा निर्गमित केला. शिवाय सोमवारपासून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. या आदेशानुसार संचारबंदीच्या काळात केवळ वैद्यकीय सेवा, मेडिकल्स, दुध आणि वृत्तपत्र वितरण सेवाच सुरू राहणार आहे.शिवाय मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉक यावर बंदी घालण्यात आली आहे. केवळ अती महत्त्वाचे काम असल्यावरच नागरिकांना घराबाहेर पडता येणार आहे. तसेच संचारबंदीच्या काळात खासगी वैद्यकीय व्यवसायिक, औषधी विक्रेता आणि त्यांच्याकडील कर्मचारी व भाजीपाला, दुध, किराणा दुकान व्यावसायिक आणि इतर छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी गांधी विद्यालय आणि मॉडेल हायस्कूल येथे सकाळी ११ ते दुपारी ५ या वेळेत कोविड चाचणी करून घ्यावी. कोविड चाचणी केल्याशिवाय कुठल्याही दुकाने आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने उघडल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून प्रतिष्ठाने आणि दुकाने सील करण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.सोमवारी १११ व्यक्तींची झाली चाचणीसोमवारी गांधी विद्यालय आणि मॉडेल हायस्कूल येथे दुपारी ५ वाजेपर्यंत छोट्या मोठ्या १११ व्यावसायिकांची तसेच त्यांच्याकडे काम करणाºया व्यक्तींची नि:शुल्क कोविड चाचणी करण्यात आली. त्यापैकी चार व्यक्तींचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला आहे. यात एका युवतीचा समावेश आहे. सोमवारी किमान १५० व्यक्तींची ‘रॅपिड अ‍ॅन्टिजेन किट’द्वारे कोविड चाचणी करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या