शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
PM मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना गिफ्ट केले 'मेलोडी चॉकलेट्स'! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
घरगुती क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
5
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
6
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
7
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
8
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
9
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
10
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
11
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
12
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
13
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
14
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
15
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
16
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
17
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
18
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
Daily Top 2Weekly Top 5

‘नो व्हेईकल डे’ द्वारे पर्यावरण जनजागृती

By admin | Updated: March 26, 2016 02:01 IST

गत १८ आठवड्यांपासून आर्वी शहरात पर्यावरणपुरक नो व्हेईकल डे हा सामाजिक उपक्रम सातत्याने नो व्हेईकल डे ...

कसबा मित्रमंडळ अष्टविनायक मंडळ आणि सनराईज इंग्लिश स्कूलचा पुढाकार
आर्वी : गत १८ आठवड्यांपासून आर्वी शहरात पर्यावरणपुरक नो व्हेईकल डे हा सामाजिक उपक्रम सातत्याने नो व्हेईकल डे कृती समिती आणि विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने सुरू आहे. शुक्रवारी २५ मार्च रोजी आर्वीतील जुना कसबा परिसरात कसबा मित्रमंडळ आणि सनराईज इंग्लिश मीडियम स्कूलच्या सहकार्याने नो व्हेईकल डे साजरा करण्यात आला.
सकाळी ८ वाजता स्थानिक पावडे हॉस्पिटल येथून नो व्हेईकल डे कृती समितीचे अध्यक्ष डॉ. अरूण पावडे यांच्या नेतृत्वात रॅलीची सुरूवात करण्यात आली. ही रॅली शिवाजी चौक, गांधी चौक, मारोती वॉर्ड आदी मार्गावरून नेण्यात आली. आर्वीतील श्रीराम शाळा येथून ही रॅली, कन्नमवार शाळा परिसरात पोहोचली. त्यानंतर कसबा परिसरात सनराईज इंग्लिश स्कूलच्या पुढाकाराने रॅलीचा समारोप झाला. समारोपप्रसंगी डॉ. पावडे, उपजिल्हा रूग्णालयाचे डॉ. नंदकिशोर कोल्हे, लॉयन्सचे अध्यक्ष डॉ. रिपल राणे, पालिकेचे माजी नगराध्यक्ष डॉ भाऊसाहेब ठाकूर, नंदकिशोर दीक्षित उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या सामाजिक उपक्रमाची माहिती देत, इतर सामाजिक संघटनांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविक कैलास लोखंडे, संचालन प्रा. प्रशांत सव्वालाखे तर आभार प्रशांत कांडलकर यांनी केले. या रॅलीत राधास्वामी, निरंकारी, लॉयन्स, रोटरी, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, आर्वी तालुका पत्रकार संघाचे प्रा. अभय दर्भे, उदय, वाजपेयी, डॉ. प्रकाश राठी, राजेश सोळंकी, सुरेंद्र डाफ, बबलू ठाकूर, विनय डोळे, माजी न. प. प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पोजगे, सनराईज इंग्लिश स्कूलचे गजानन सोनटक्के, प्रशांत कांडलकर, अविनाश कदम, नरंद्र रावत, ओमप्रकाश मेघवानी, अनिल भट्ट, प्रकाश देशमुख, शंकर आगरकर, रेणूका सोयल ग्रृप, कपील ठाकूर, अष्टविनायक मंडळ व इतर सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या प्रसंगी नो व्हेईकल डे चा पुरस्कार करणाऱ्या ज्ञानेश्वर पोजगे यांचा कृती समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.(तालुका प्रतिनिधी)