शहरं
Join us  
Trending Stories
1
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
2
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
3
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
4
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
5
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
6
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
7
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
8
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
9
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
10
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
11
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
12
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
13
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
14
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
15
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
16
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
17
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
18
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
19
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
20
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परवानगी न घेता विहिरीवर अतिक्रमण

By admin | Updated: May 25, 2016 02:19 IST

कुठलीही परवानगी न घेता सोनेगाव (बाई) येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील कच्च्या विहिरीवर वीज वितरण कंपनीने वीज तारा टाकून रोहित्र बसविले.

वीज वितरणचा प्रताप : सिंचनाचा प्रश्न ऐरणीवरवर्धा : कुठलीही परवानगी न घेता सोनेगाव (बाई) येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील कच्च्या विहिरीवर वीज वितरण कंपनीने वीज तारा टाकून रोहित्र बसविले. यामुळे सदर कच्च्या विहिरीचे बांधकाम व खोदकाम रखडले आहे. त्यामुळे हा प्रकार थांबवून रोहित्र हटवावे अशी मागणी शेतकरी हरिदास गणपत गोटे यांनी जिल्हाधिकारी व महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना निवेदनाद्वारे केली आहे. देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथील हरिदास गणपत गोटे यांचे मौजा चिखली येथे सर्व्हे नं. २६३, आराजी १ हेक्टर ६२ आर असे शेत आहे. या शेतात त्यांची स्वत:ची विहीर आहे. पैश्याअभावी ते अद्याप विहिरीचे बांधकाम व चांगले खोदकाम करू शकले नाही. यंदा त्यांनी शेतात डाळींबाची लागवड केली आहे. विहिरीचे पाणी पुरत नसल्याने काही दिवसांनी विहिरीचे खोदकाम ते सोबतच पक्के बांधकामही करणार होते. असे असताना वीज वितरण कंपनीने त्यांची कुठलीही परवानगी न घेता शेतातील विहिरीच्या अगदी तोंडावर रोहित्राचे खांब घेतले. तसेच विहिरीच्या उजव्या हातावर शिवपांदन रस्ता असतानाही रोहित्र टाकण्याची व्यवस्था केली. हा प्रकार जीवघेणा ठरत आहे. तसेच रोहित्रामुळे विहिरीचे बांधकाम व खोदकाम करण्यास अडचण येत आहे. ये जा करण्याचा रस्ताही यामुळे बाधित झाल्याने अडचण येत आहे. रोहित्र विहिरीच्या अगदी तोंडावर असल्यामुळे आणि वीज पुरवठा सुरू असल्याने विहिरीचे खोदकाम होऊ शकत नाही. याचा परिणाम डाळींब पिकाच्या सिंचनावर होत आहे. झाडे वाळण्याच्या मार्गावर आहे.शेतातील विहिरीच्या तोंडावर बसविलेले रोहित्र ताबडतोब हटवावे आणि विहीर खोदकाम व पक्क्या बांधकामासाठी मोकळी करू अद्यावी अशी मागणी गोटे यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे केली आहे. रोहित्र न हटविल्यास आत्महत्या करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी निवेदनातून दिला आहे.(शहर प्रतिनिधी)