शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीच्या शासकीय केंद्रांवर कर्मचाऱ्यांची बोंब

By admin | Updated: February 26, 2017 00:49 IST

तुरीचे दर पडल्याने शासनाने नाफेड आणि भारतीय खाद्य निगमच्या माध्यमातून शासकीय दरात तूर खरेदीचा निर्णय घेतला.

शेतकऱ्यांचे उपनिबंधकांना साकडे : पुरक सेवा देण्याच्या सूचना रूपेश खैरी   वर्धा तुरीचे दर पडल्याने शासनाने नाफेड आणि भारतीय खाद्य निगमच्या माध्यमातून शासकीय दरात तूर खरेदीचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार जिल्ह्यातील बाजार समित्यांत या दोन्ही शासकीय एजन्सीचे केंद्र सुरू केले; मात्र येथे कर्मचाऱ्यांच्या कमतरतेची बोंब असल्याने तूर घेवून आलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. वर्धा जिल्ह्यात बाजार समिती आणि त्यांच्या उपबाजारातून शेतमालाची खरेदी होत आहे. व्यापाऱ्यांकडून मिळणारे अत्यल्प दर टाळण्याकरिता नाफेडची स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली. त्याच्या मदतील भारतीय खाद्य निगम आणि विदर्भ मार्केटींग फेडरेशनच्यावतीने हमीभावात तुरीची खरेदी होत आहे. यामुळे केंद्रावर शेतकऱ्यांची आवक वाढत आहे. अनेकांनी दर वाढीच्या प्रतीक्षेत तूर घरीच ठेवली होती. आणि आता तुरीचे नवे उत्पादनही निघणे सुरू झाले आहे. यामुळे बाजारात तुरीची आवक वाढत आहे. बाजारातील दर हमीभावापेक्षा कमी असल्याने शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी आहे; मात्र येथे कर्मचाऱ्यांची कमतरता शेतकऱ्यांकरिता डोकेदुखी ठरत आहे. शासकीय केंद्रावर तुरीची वाढलेली आवक आणि असलेली कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ होत आहे. शेतमाल घेवून आलेल्या शेतकऱ्यांना रात्र बाजार समितीच्या आवारातच काढावी लागत आहे. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी उपनिबंधक कार्यालयात धाव घेतली. शेतकऱ्यांच्या या तक्रारीवरून उपनिबंधक कार्यालयात नाफेड आणि भारतीय खाद्य निगमच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत बाजार समितीच्या सभापतींची बैठक झाली. या बैठकीत केंद्रावरील कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्या, तसेच शेतकऱ्यांची होत असलेली धावपळ थांबविण्याकरिता नवे केंद्र सुरू करण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती आहे. सात केंद्रातून ४७ हजार क्विंटल खरेदी जिल्ह्यातील सात शासकीय खरेदी केंद्रांमधून ४६ हजार ८२५ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. त्यामध्ये आर्वीत १२ हजार ६८६ क्विंटल, हिंगणघाट १९ हजार ५२२, वर्धा ४ हजार ५३१, सेलूत ६ हजार १४९, सिंदी (रेल्वे)त दोन हजार ९३६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकरिता ही कागदपत्रे आवश्यक शासकीय यंत्रणेला तुरीची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना काही कागदपत्रेही सोबत द्यावी लागत आहेत. त्यामध्ये सातबारा, पेरापत्रक, ओळखपत्र तसेच बँक पासबुकाची झेरॉक्स यंत्रणेला द्यावयाची आहे. जास्तीत जास्त वेळ होणार खरेदी जिल्ह्यात बाजार समितीत्यात नाफेड आणि भारतीय खाद्य निगमच्यावतीने शासकीय दरात तूर खरेदी होत आहे. मात्र हे केंद्र मोजकेच काळ सुरू राहत असल्याने येथे येणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण होते. वेळ संपल्याने अनेक शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल घेवून परतीचा मार्ग पकडावा लागत आहे. यात त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. यामुळे बाजार समितीतील केंद्र अधिकाधिक काळ सुरू ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. तीन नवे केंद्र सुरू होणार सध्या हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, कारंजा (घाडगे) केंद्रावरून नाफेडची खरेदी होत आहे. तर वर्धा, सेलू आणि सिंदी येथे भारतीय खाद्य निगमची खरेदी आहे. यामुळे या केंद्रावर परिसरातील शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी करण्याकरिता आणखी तीन नवे केंद्र उघडण्यात येणार आहे. यात समुद्रपूर, देवळी आणि सिंदी बाजार समितीचा समावेश आहे.