शहरं
Join us  
Trending Stories
1
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
2
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
3
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
4
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
5
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
6
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
7
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
8
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
9
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
10
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
11
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
12
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
13
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
14
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
15
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
16
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
17
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
18
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
19
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
20
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या गुन्हेगारीने महासंचालक चिंतेत

By admin | Updated: May 5, 2016 02:27 IST

यवतमाळ शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून खून, खुनाचा प्रयत्न, घरफोड्या, चोऱ्या, वाटमारी या सारखे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

यवतमाळ जिल्हा : ‘आयजी’ घेणार आज आढावा
यवतमाळ : यवतमाळ शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून खून, खुनाचा प्रयत्न, घरफोड्या, चोऱ्या, वाटमारी या सारखे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याबाबत थेट राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती परिक्षेत्राचे प्रभारी पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांना गुरुवारी ५ मे रोजी यवतमाळात क्राईम मिटींगसाठी पाठविण्यात आले आहे.
अमरावतीचे महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल रजेवर आहेत. त्यांचा अतिरिक्त प्रभार राज्य राखीव पोलीस दलाचे नागपूर येथील महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांच्याकडे आहे. ते गुरुवारी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व ठाणेदार आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत. विशेष असे यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह हेसुद्धा ११ मेपर्यंत रजेवर असल्याने त्यांचा अतिरिक्त प्रभार अपर अधीक्षक काकासाहेब डोळे यांच्याकडे आहे.
जानेवारी ते एप्रिल २०१६ या चार महिन्यात जिल्ह्यात प्रॉपर्टी व शरीरासंबंधीच्या गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यात तर दरदिवशी कुठे खून, कुठे घरफोडी तर कुठे वाटमारी जणू नित्याचीच झाली होती.
खून, खुनाचा प्रयत्न हे गुन्हे मोठ्या प्रमाणात दाखल झाले. जुना गुन्हा उघडकीस येण्यापूर्वीच नवा गुन्हा घडत आहे. ही गुन्हेगारी रोखण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून व्यापक प्रतिबंधात्मक उपाययोजनाही होताना दिसत नाही. सर्रास गुन्हे घडत आहे. परंतु डिटेक्शनचा पत्ता नाही. भरदिवसा घरफोड्या होत आहेत. चोरटे लाखो रुपयांच्या रोकड, सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर हात साफ करीत आहे. दिवसाढवळ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याच्या, बॅग हिसकावण्याच्या घटना घडत आहे. मात्र चोरटे शोधण्यात पोलिसांना यश येत नाही.
जानेवारी ते एप्रिल या चार महिन्याचा क्राईम चार्ट पाहून खुद्द पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनीही चिंता व्यक्त केली. अखेर या वाढत्या गुन्हेगारीला प्रतिबंध घालणे, डिटेक्शन वाढविणे याबाबत मार्गदर्शन करून गुन्हेगारीचा आढावा घेण्यासाठी खास पोलीस महानिरीक्षकांना महासंचालकांनी जिल्ह्यात पाठविले. गुरुवारी ते क्राईम मिटींग घेऊन महासंचालकांना अहवाल सादर करणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

एकाच महिन्यात ११ खून
सन २०१६ मध्ये एकट्या मार्च महिन्यात जिल्ह्यात तब्बल खुनाच्या ११ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. खुनाचा प्रयत्न ११, बलात्कार १०, दंगे २८, दुखापत १२८, महिलांसंबंधीचे गुन्हे १२६, दरोड्याचा प्रयत्न १ तर अ‍ॅट्रोसिटीचे १४ गुन्हे एकाच महिन्यात नोंदविले गेले आहे. अशीच आकडेवारी एप्रिल महिन्याचीसुद्धा आहे. काही प्रकरणात त्यात उलट वाढ झाली आहे. घडणाऱ्या घटनांच्या तुलनेत डिटेक्शन मात्र नसल्यात आहे.
जिल्हा दंडाधिकारीही नाराज
यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या सध्याच्या कामगिरीवर खुद्द जिल्हा दंडाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह यांनीही नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. पोलिसांची पकड सैल झाल्याचे नमूद करीत त्यांनी ‘मिनी एसपी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची कक्षात बोलावून चांगलीच झाडाझडती घेतल्याचे सांगितले जाते.