शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
6
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
7
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
8
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
9
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
10
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
11
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
12
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
13
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
14
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
15
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
16
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
17
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
18
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
19
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
20
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे सावट

By admin | Updated: June 21, 2017 00:41 IST

हवामान खात्याने दिलेल्या पावसाच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पेरणी केली.

१,५१७ हेक्टरवरील पेरण्या धोक्यात : पाऊस बेपत्ता; जमिनीला भेगा लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : हवामान खात्याने दिलेल्या पावसाच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पेरणी केली. पेरणी केल्यावर एक पाऊस आला. यामुळे जमिनीत पेरलेले बियाणे अंकुरले; मात्र यानंतर पाऊस बेपत्ता झाला असून बियाण्यांचे अंकूर करपणे सुरू झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील सुमारे १ हजार ५१७ हेक्टरवरील पेरण्या धोक्यात आल्या असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या प्रारंभी आलेल्या तुरळक पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा बळावल्याने त्यांनी कपाशीची लागवड केली. अशातच हवामान खात्याने ११ जून रोजी मान्सून धडकणार असल्याचे जाहीर केले होते. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी चांगले उत्पादन घेण्याच्या आशेपोटी कपाशीची लागवड केली. जमिनीत असलेल्या ओलाव्यामुळे टाकलेले बियाणे अंकुरले. बियाण्यांच्या अंकुराला पावसाची गरज असताना पाऊस बेपत्ता झाला. परिणामी अंकुर करपत आहेत. पाऊस आला नसल्याने जमिनीत टाकलेले काही बियाणे दबल्या गेले आहे. शेतातील निम्मे पिक करपण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. तर ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे त्यांच्याकडून स्प्रिकलरच्या सहायाने पिके जगविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र वाढत्या तापमानामुळे व सततच्या भारनियमनामुळे तेही करणे अडचणीचे ठरत आहे. जर या दोन दिवसात पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आल्याशिवाय राहणार नाही, अशी स्थिती जिल्ह्यात आज निर्माण झाली आहे.