शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

टंचाईत ‘ते’ नि:शुल्क देतात बोअरवेलचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 10:21 PM

स्वखर्चातून केलेल्या विंधन विहिरीतील पाण्याच्या माध्यमातून संवेदनशील मनाची व्यक्ती निम्म्या परिसराची तहान भागवत असल्याचे चित्र गोंड प्लॉट केजाजी चौक येथे पाहायला मिळाले.

ठळक मुद्देसंडे अँकर । गोंड प्लॉट येथील संजय चौधरी यांची संवेदनशीलता; रहिवाशांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वखर्चातून केलेल्या विंधन विहिरीतील पाण्याच्या माध्यमातून संवेदनशील मनाची व्यक्ती निम्म्या परिसराची तहान भागवत असल्याचे चित्र गोंड प्लॉट केजाजी चौक येथे पाहायला मिळाले.संजय पुंडलिकराव चौधरी असे या व्यक्तीचे नाव असून केजाजी चौक, वॉर्ड क्रमांक ११ येथे त्यांचे किराणा दुकान आहे. मागील अनेक वर्षांपासून ते येथे वास्तव्याला आहेत. अल्प पर्जन्यमानामुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कधी नव्हे, एवढी पाणीटंचाई निर्माण झाली. दिवस उजाडताच आया-बहिणींची आपल्या लहानग्यांसह हंडाभर पाणी मिळविण्यासाठी होणारी धावाधाव पाहून संजय यांच्या मनाला पाझर फुटला. आपल्या संस्कृतीत तहानलेल्यांना पाणी देणे पुण्याचे काम समजले जाते. हे ध्यानात घेत संजय चौधरी यांनी घराशेजारीच तब्बल ६० हजार रुपये खर्च करून विंधन विहीर केली. विंधन विहिरीला १८० फुटांवरच पाणी लागले आहे. गोंड प्लॉटमध्ये अनेकांकडे खासगी विहिरी, कूपनलिका आणि विंधन विहिरीदेखील आहेत. मात्र, पाण्याचे हे सर्वच स्रोत कोरडे पडले आहेत. अनेकांनी नव्याने विंधन विहिरी केल्या; मात्र पाणीच लागले नाही.परिसरात निर्माण झालेली भीषण पाणीटंचाई लक्षात घेता स्वत: घरगुती वापराकरिता पुरेल एवढे पाणी घेऊन पाण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या नागरिकांनाही पाणी द्यायचे त्यांनी ठरविले. मागील २० दिवसांपासून ते नागरिकांना आपल्या येथील विंधन विहिरीचे पाणी कुठलेही शुल्क न घेता उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास त्यांच्याकडे पाण्याकरिता प्रचंड गर्दी पाहायला मिळते. पाणी मिळत असल्याने नागरिकही समाधानी असून त्यांचे आभार मानताना दिसतात. माणुसकी आजही जिवंत असल्याच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत.नगरसेवकांची निष्क्रियतागोंड प्लॉट, केजाजी चौक वॉर्ड क्रमांक ११ येथील विहिरी, कूपनलिका, विंधन विहिरींना केव्हाच कोरड पडली आहे. नगरपालिकेद्वारे सात दिवसांआड पाणीपुरवठा होतो, मात्र हे पाणी आठ दिवस पुरत नाही. वॉर्डात पाणीप्रश्न पेटला असताना संबंधित नगरसेवकांकडून कुठलेही प्रयत्न झाले नाहीत. नागरिक पाणी समस्या घेऊन नगरसेवकांकडे गेले असता टॅकरची व्यवस्था करू, असे केवळ आश्वासन त्यांच्याकडून दिले जाते. प्रत्यक्षात कुठल्याही हालचाली केल्या जात नाहीत. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेविषयी नागरिकांत प्रचंड रोष आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई