शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

परवान्याकरिता वाहनचालकांची तोबा गर्दी

By admin | Updated: June 16, 2014 23:38 IST

येथील विश्रामगृहात महिन्याच्या १० तारखेला वाहन चालविण्याच्या परवान्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत एक दिवसीय शिबिर घेण्यात येते. या शिबिरात परवाना काढण्यासाठी वाहन चालकांची मोठी गर्दी

दलालांचा सुळसुळाट : मध्यस्थांमार्फत वाहनचालकांची लूटसमुद्रपूर : येथील विश्रामगृहात महिन्याच्या १० तारखेला वाहन चालविण्याच्या परवान्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत एक दिवसीय शिबिर घेण्यात येते. या शिबिरात परवाना काढण्यासाठी वाहन चालकांची मोठी गर्दी होत असून परवाना काढून देणाऱ्या मध्यस्थांमार्फत वाहन चालकांची प्रचंड लूट होत आहे.तालुक्यातील विविध वाहन चालकांच्या सुविधेसाठी जानेवारी २०१४ पासून महिन्याच्या १० तारखेला चालक परवाना देण्यासाठी एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात येते. यापूर्वी परिसरातील वाहन चालकांना परवान्यासाठी हिंगणघाट येथे जावे लागत होते. येथील वाहन चालकांची परवाना काढण्यासाठी होणारी गैरसोय दूर करण्यासाठी या शिबिराचे आयोजन समुद्रपूर येथे करण्यात येते; परंतु परवाना काढून देणाऱ्या दलालांचा येथे सुळसुळाट वाढला असून वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. या शिबिरामध्ये दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहन चालकांना परवाना दिला जातो. यासोबतच अवजड वाहनांचे पासिंग सुद्धा केले जाते. विविध प्रशिक्षण शाळेच्या प्रतिनिधींसह काही दलालांमार्फत परवाना काढून देण्यासाठी शासकीय शुल्कापेक्षा तिप्पट ते पाचपट रक्कम वसूल केल्या जाते. येथे सक्रीय असलेले दलाल वाहनचालकांकडून आवश्यक कागदपत्रे मागवून घेतात. त्या आधारावरावर शिकावू परवाना निघाल्यानंतर एक महिन्यानंतर कायम परवाना देण्यात येतो. विश्रामगृहाच्या छोट्याशा आवारात वाहनचालकांची थातूर मातूर ट्रायल घेण्यात येते. यामुळे विश्रामगृह परिसरात महिन्याच्या १० तारखेला वाहनांची गर्दी होते. परवान्यासाठी वाहन चालकांना उन्हात रांगेत उभे राहावे लागते. संबंधित विभागाने नियमांचे पालन करून वाहनचालकांची आर्थिक लूट थांबविण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)