शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

जखमी रोह्याचा उपचाराअभावी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 21:53 IST

पाण्याच्या शोधात भटकलेल्या रोह्यावर गावातील कुत्र्यांनी हल्ला चढवून त्याला जखमी केले. त्याला वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी आदर्शनगरात घडली.

ठळक मुद्देपाण्याच्या शोधात आला गावात : वन विभागाचे कर्मचारी पोहोचले उशिरा

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : पाण्याच्या शोधात भटकलेल्या रोह्यावर गावातील कुत्र्यांनी हल्ला चढवून त्याला जखमी केले. त्याला वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी आदर्शनगरात घडली.पाण्याचे सर्वत्रच दुर्भिक्ष्य असल्याने याचा फटका आता मानवासह जनवारांनाही सहन करावा लागत आहे. जंगलात पाण्याची सोय नसल्याने जंगली जनावरांनी पाण्याकरिता गावाकडे धाव घेतली आहे. असाच एक रोही पाण्याच्या शोधात आदर्शनगरात आला. रोह्याला पाहताच कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला.कुत्र्यांपासून आपला जीव वाचविण्याकरिता सुसाट पळत सुटलेला हा रोही नंदू वाळके यांच्या घराच्या आवारात शिरला. तेथे नागरिकांनीही मोठी गर्दी केल्याने कुत्रे आणि नागरिकांची गर्दी पाहून तो चांगलाच घाबरला. रोह्याच्या डाव्या कानाला मार लागल्याने दीपक भोंगाडे यांनी वनविभागाला याची माहिती दिली. वनरक्षक बि.एम.इंगळे आणि मजरे हे तीन वाजताच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले.तसेच पिपल फॉर अ‍ॅनिमल्सचे कौस्तुभ गावंडेही आपल्या सहकाऱ्यांसोबत दाखल झाले.पण, तोपर्यंत उपचाराअभावी रोह्याचा मृत्यू झाला. तीन ते चार वर्षाची मादी असल्याचे वनविभागाने सांगितले. वनरक्षकांनी पंचनामा करुन मृत रोह्याला ताब्यात घेतले.आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास रोही घाबरलेल्या अवस्थेत आवारात शिरला. त्याच्या मागे परिसरातील कुत्र्येही दिसून आले. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने त्याला पिण्याकरिता पाणी ठेवले आणि वनविभागाला संपर्क केला. पण, वनविभागाचे कर्मचारी उशिरा पोहोचल्याने जखमी रोह्याला वेळीच उपचार मिळू शकले नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.- दीपक भोंगाडे, आदर्शनगर.