शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

बहुप्रतिक्षित रेल्वे उड्डाणपुलाच्या पूर्णत्वाचा मार्ग मोकळा

By admin | Updated: May 18, 2017 00:31 IST

राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे फाटक क्र. १४ वरील उड्डाण पुलाचे गडर टाकण्याचे काम बुधवारी पूर्णत्वास गेले.

सात वर्षांपासून रखडले होते काम : दोन वेळा मेगा ब्लॉक जाहीर करून टाकले गडर्स लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे फाटक क्र. १४ वरील उड्डाण पुलाचे गडर टाकण्याचे काम बुधवारी पूर्णत्वास गेले. बहुप्रतिक्षित पुलाच्या निर्मितीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तत्पूर्वी १२ मे रोजी रेल्वे विभागाने मेगा ब्लॉक केला होता. एका बाजूचे ५ गडर पुलावर टाकले. यानंतर आज उर्वरित ५ गडर टाकल्याने ७ वर्षांपासून अपूर्ण असलेल्या पुलाच्या कामाला गति मिळाली आहे. हे काम विजयवाडा येथील केव्हीआर कॉन्ट्रॅक्टर अ‍ॅण्ड इंजीनियरिग प्रा.लि.ने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे तांत्रिक व्यवस्थापक आशुतोष पिंपळे, मध्य रेल्वेचे सीनियर डीएम पवन पाटील, भावेशकुमार झा, सीनियर डीओएम प्रवीण वंजारी, कार्यकारी अभियंता पवार, सिन्हा, यांच्या उपस्थिती व मार्गदर्शनात कामगार तसेच अत्याधुनिक संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करून दोन अजस्त्र के्रनच्या साह्याने यशस्वीरित्या पूर्ण केले. या अवजड लोखंडी गडर्सवर आता सिमेंट स्लॅब टाकण्यात येणार असून हे काम पूर्ण होताच पूल वाहतूकीसाठी खुला होणार आहे; पण संबंधित कंत्राटदार किती वेळेत हे काम पूर्ण करतात, यावर भवितव्य अवलंबून आहे. अर्धवट पुलामुळे जनतेला वाहतुकीचा प्रचंड त्रास होता. अनेक अपघातही या मार्गावर झाले. सामाजिक कार्यकर्ते मनोज रूपारेल यांनी हा प्रश्न उचलून धरला होत. खा. रामदास तडस, आ. समीर कुणावार, अन्य सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांनी सरकार दरबारी आवाज उचलल्याने अखेर रेल्वेने दोन वेळा मेगा ब्लॉक जाहीर करून पूल निर्मितीचा मार्ग मोकळा केला. हे गडर्स टाकण्याचे अभिनव काम पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. दोन अजस्त्र के्रनच्या साह्याने हे अवजड गडर उंच पुलावर अलगद, अचूक टायमिंग साधत ठेवण्याचे कौशल्य व तंत्रज्ञानाची भरारी पाहून सर्व थक्क झाले. या मार्गावरील वाहतूक हिंगणघाट शहरातून वळविण्यात आली होती.