शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

दिग्गजांचे स्वप्न भंगले

By admin | Updated: June 11, 2016 02:28 IST

मिनिमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आपली वर्णी लागावी, अशी अनेक दिग्गजांची मनोमन इच्छा असतानाच ..

जि.प.अध्यक्षपद : अनुसूचित जमातीसाठी राखीववर्धा : मिनिमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आपली वर्णी लागावी, अशी अनेक दिग्गजांची मनोमन इच्छा असतानाच शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद आरक्षणाची सोडत निघाली. यात वर्धेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव झाले. परिणामी अध्यक्षपदाचे स्वप्न रंगवित असलेल्या अनेक दिग्गजांच्या स्वप्नांचा पार चुराडा झाला, तर कधी अध्यक्षपदी आपली वर्णी लागेल, याचा विचारही केला नाही, अशांच्या आशा आता पल्लवीत झाल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या आवारात एकंदरीत ‘कही खुशी कधी गम’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. वर्धा जिल्हा परिषदेची निवडणूक मार्च २०१७ मध्ये होऊ घातली आहे. निवडणुकीच्या कालावधीची माहिती मिळताच जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय असलेल्या विविध प्रवर्गातील अनेक दिग्गजांनी अध्यक्षपद भुषविण्याचे स्वप्न मनोमन रंगविले होते. यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ नाना ढगे, विजय जयस्वाल, कलावती वाकोडकर यांच्यासह विद्यमान उपाध्यक्ष विलास कांबळे, माजी जि.प. उपाध्यक्ष संजय कामनापूरे, जि.प. सदस्य मनोज चांदूरकर, गजानन गावंडे तसेच माजी शिक्षण व आरोग्य सभापती मारेश्वर खोडके यांच्या आगामी निवडणुकीत अध्यक्षपदावर डोळा होता. गत पंचवार्षिकेत अध्यक्षपदापासून वंचित राहणाऱ्या या दिग्गजांनी येत्या पंचवार्षिकेत जिल्हा परिषद आपलीच, असे म्हणत कामही सुरू केले होते. त्यांनी आपल्या सर्कलमधील मतदारांशीच नाही तर पक्षश्रेष्ठींकडे ‘फिल्डींग’ लावणे सुरू केले होते. यात काहींनी आपल्याला यश येत असल्याचा गवगवाही करणे सुरू केले होते. अशात अध्यक्षपद अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता राखीव झाल्याने त्यांचा पुरता हिरमोड झाला. अध्यक्षपदाच्या त्यांच्या आशा जागीच विरल्या.आज जाहीर झालेल्या आरक्षणानुसार अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा झाला तर ज्यांनी अध्यक्षपदाचा विचारही केला नाही त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. आता आपणही अध्यक्ष होऊ शकतो असे वाटणे स्वाभाविकच आहे. सध्या सत्तेत असलेल्या या प्रवर्गाच्या उमेदवारांना अध्यक्षपदाच्या आशा असल्या तरी नव्या प्रभाग रचनेत त्यांचे आरक्षण कायम राहाते वा ते रद्द होवून नवे आरक्षण येते याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. विद्यमान स्थितीत जिल्हा परिषदेचे सदस्य असलेल्या अनुसूचित जमातीचे सातही सदस्य आपल्या सर्कलचे आरक्षण कायम रहावे, यावर लक्ष केंद्रीत करून आहे. हे त्यांचे स्वप्न दिग्गजांप्रमाणे भंग होते वा ते पूर्ण करण्याची संधी मिळते याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)