शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील गौरी-गणेश उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देऊ नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 05:00 IST

तहसील कार्यालयामध्ये सण, उत्सवाच्या प्रार्श्वभूमीवर तहसीलदार राजेश सरवदे यांनी तालुक्यातील पोलीस पाटील व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला नायब तहसीलदार राजेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर उपस्थित होते. सार्वजनिक गणेश उत्सवाचे पावित्र राखण्यासोबतच कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी ग्रामीण भागात पोलीस पाटील व शहरी भागात नगरपालिका अधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारावी.

ठळक मुद्देतहसीलदारांचे निर्देश : देवळी तालुक्यातील पोलीस पाटलांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आगामी गौरी-गणेश उत्सवाच्या धार्मिक सोहळ्यासोबतच बैल पोळ्याच्या सणाला सार्वजनिक स्वरूप येवू न देता नियमांचे पालन करा. तसेच गर्दी होणार नाही, याची काळजी घेत घरगुती वातावरणात सण साजरे करुन प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन तहसीलदार राजेश सरवदे यांनी दिले.तहसील कार्यालयामध्ये सण, उत्सवाच्या प्रार्श्वभूमीवर तहसीलदार राजेश सरवदे यांनी तालुक्यातील पोलीस पाटील व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला नायब तहसीलदार राजेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर उपस्थित होते. सार्वजनिक गणेश उत्सवाचे पावित्र राखण्यासोबतच कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी ग्रामीण भागात पोलीस पाटील व शहरी भागात नगरपालिका अधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारावी. शहरी भागात ‘एक मोहल्ला, एक गणपती’ व ग्रामीण भागात ‘एक गाव, एक गणपती’ ची संकल्पना रुजविण्याकरिता गावागावात दवंडी द्यावी. सार्वजनिक गणपती चार फुट तर घरगुती गणपती दोन फुट उंचीचा असावा. गणेशाची मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरीसची न बसविता पर्यावरणपुरक मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. गणेश स्थापनेची परवानगी शहरीभागात पोलीस स्टेशनकडून व ग्रामीण भागात ग्रामसचिवाकडून घ्यावी. गणेश मूर्ती विक्रीच्या ठिकाणी ग्राहकांची नोंद घेण्याची व्यवस्था करावी. गणेशाचे आगमण व विसर्जनासाठी चार व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा असावी. मोठा मंडप, लाऊडस्पिकर व डिजे न लावता साधेपणाने उत्सवाची तयारी करावी. दर्शनासाठी येणाºया भाविकासाठी थर्मल स्क्रीनिंग व हॅण्डवॉशची व्यवस्था करावी. सांस्कृतिक व मनोरंजनाचे कार्यक्रम न घेता त्याऐवजी कोरोना जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाय, याबाबतचे कार्यक्रम व आरोग्यविषयक शिबिर घेवून प्रबोधन करावे, आदी सूचना देण्यात आल्या. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसात तक्रार देवून गुन्हा दाखल करावा, असेही निर्देश या बैठकीत देण्यात आले.पोलीस पाटलांनी मुख्यालयी राहावेबैलपोळ सार्वजनिक ठिकाणी न भरविता, राहते घरी सजविलेल्या बैलांची पुजा करून सोपस्कर पूर्ण करावे. वाजंत्रीसह बैलांची मिरवणूक काढण्यावर बंदी घालण्यात यावी. कोरोना आजाराचा अपेक्षीत धोका व यासाठी शासकीय नियमांचे पालन करण्याबाबत लोकांना जागृत करण्यात यावे. त्याकरिता पोलीस पाटील यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक असून कोणतेही कारण ऐकले जाणार नाही. या कामात टाळाटाळ करणाºयावर कारवाई करण्यात येईल, असे निर्देशही तहसीलदार राजेश सरवदे व पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी पोलीस पाटलांना दिलेत.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव