शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

श्वान, बॉम्ब शोध पथकात पाच श्वान देताहेत सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 05:00 IST

प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी सांभाळत असले तरी पोलीस श्वान पथकातील रॉकी, बादल जॉनी तर बॉम्ब शोधक पथकातील डॉन आणि रेम्बो हे श्वान पोलीस अधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून महत्त्वाचीच भूमिका बजावत आहेत.

ठळक मुद्देरॉकी, बादल, जॉनी तर डॉन, रेम्बो घालतोय भुरळ

महेश सायखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी सांभाळत असले तरी पोलीस श्वान पथकातील रॉकी, बादल जॉनी तर बॉम्ब शोधक पथकातील डॉन आणि रेम्बो हे श्वान पोलीस अधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून महत्त्वाचीच भूमिका बजावत आहेत. अनेक प्रकरणात हे पाचही श्वान अधिकाऱ्यांसाठी मदतगार ठरले असून त्यांची काम करण्याची पद्धत अनेकदा सुरक्षा यंत्रणेतील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना भूरळच घातले.पोलीस श्वान पथकातील रॉकी व बादल हे दोघे डॉबरमॅन प्रजातीचे श्वान असून ते चोरट्यांचा मागोवा घेण्यासह गुन्ह्यांचा शोध घेण्यात तरबेज आहेत. तर जॉनी हा स्फोटक शोधण्यात तरबेज आहे. १२ मार्च २०१६ ला जन्मलेल्या रॉकी तर १८ नोव्हेंबर २०१६ ला जन्मलेल्या बादलचे प्रशिक्षण पूणे येथील श्वान प्रशिक्षण केंद्रात पूर्ण झाले. रॉकीने ८ आॅगस्ट २०१६ ते ८ मे २०१७ या कालावधीत तर बादल याने २१ जुलै २०१७ ते २७ एप्रिल २०१८ या कालावधीत सैनिकासारखेच प्रशिक्षण घेतले. तर १२ डिसेंबर २०१७ ला जन्मलेल्या जॉनीने ५ जुलै २०१८ ते १७ जानेवारी २०१९ या कालावधीत चंदीगढ येथे स्फोटकांचा शोध घेण्याचे प्रशिक्षण घेतले. रॉकी आणि बादल वर्षाला सुमारे ७५ कॉल अटेंड करतात तर जॉनी वर्षाला सुमारे २५ कॉल अटेंड करीत असल्याचे सांगण्यात आले. शिवाय बॉम्ब शोधक व नाशक पथकात सध्या डॉन आणि रेम्बो सेवा देत आहेत. हे दोन्ही श्वान लॅब्राड्रार प्रजातीचे आहेत. तीन वर्षांचा डॉन तर दोन वर्ष वयोगटाचा रेम्बो अतिशय उत्कृष्टपणे स्फोटक शोधून काढण्यात तरबेज आहेत.पोलीस श्वान पथकाची दूरा सध्या पोलीस उपनिरीक्षक संजय नेरकर तर बॉम्ब शोधक व नाशक पथकाची दूरा सध्या पोलीस उपनिरीक्षक राजेश्री रामटेके सांभाळत आहेत. रॉकी, बादल, जॉनी तर डॉन आणि रेम्बो हे पाचही श्वान त्याच्यावर सोपविलेली जबाबदारी नेहमीच उत्कृष्टपणे पार पाडत असल्याचे सांगण्यात आले.‘शिवा’ अन् ‘राणा’ जीव की प्राणपोलीस श्वान पथकात यापूर्वी शिवा आणि राणा हे दोघे श्वान होते. १८ ऑगस्ट २००६ ला जन्मलेल्या या दोन्ही भावंडांनी पोलीस श्वान पथकात दीर्घ कालीन सेवा दिली. शिवा स्फोटक शोधण्यात तर राणा गुन्ह्यांचा शोध घेण्यात तरबेज होता. शिवा हा श्वान ३१ ऑगस्ट २०१६ ला तर राणा हा श्वान ३ डिसेंबर २०१५ ला सेवानिवृत्त झाला. शिवा अन् राणा हे दोघे भावंड एखाद्या प्रकरणात अचूक निकषावर पोहून त्यांची माहिती विशिष्ट पद्धतीने त्यांच्या हॅन्डलरला देत असे. त्यामुळे ते सदर पथकातील अनेकांचे जीव की प्राणच होते. शिवा अन् राणा यांचा सेवानिवृत्तनंतर मृत्यू झाला. त्यानंतर या पथकात रॉकी, बादल व जॉनी या श्वानांची सेवा देण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय ते सध्या उत्कृष्ट पद्धतीने सेवा देत आहेत.बॉम्बशोधक व नाशक पथकात पूर्वीही होता ‘डॉन’बॉम्ब शोधक व नाशक पथकात सध्या तीन वर्षीय डॉन तर दोन वर्षीय रेम्बो सेवा देत आहेत. असे असले तरी त्यांच्यापूर्वी याच पथकात डॉन व डिव्ह ही दोन श्वान होती. त्यांनी सुमारे दहा वर्ष सेवा दिली. त्यानंतर त्यांना सेवानिवृत्त करण्यात आले. सेवानिवृत्त झाल्यानंतर अवघे काहीच महिने त्यांनी बाहेरच्या जगात श्वास घेतला. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. डॉन आणि डिव्ह यांच्या मृत्यूनंतर त्यांची जागा डॉन व रेम्बो यांनी घेतली असल्याचे सांगण्यात आहे.

श्वान पथकाला २००८ मध्य पहिला अधिकारीपोलीस श्वान पथकाला प्रथम पोलीस अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक नवरत्तम पुरी हे लाभले. ९ जानेवारी २००८ ला त्यांच्याकडे सदर पथकाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळानंतर पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर जोशी यांना जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सतीश लाड यांच्याकडे या पथकाची जबाबदारी सोपविण्यात आली. तर सध्या पोलीस उपनिरीक्षक संजय नेरकर हे पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनात पोलीस श्वान पथकाची जबाबदारी सांभाळत आहेत.

 

टॅग्स :Policeपोलिस