शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकल्या नवरगाववासीयांच्या व्यथा

By admin | Updated: June 14, 2014 23:45 IST

शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी एन. नवीन सोना आणि जि.प.मुख्यकार्यपालन अधिकारी उदय चौधरी यंत्रणेसह सेलू तालुक्यातील नवरगाव(हेटी) या दुर्गम शुक्रवारी सायंकाळी दाखल झाले.

शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणीसेलू : शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी एन. नवीन सोना आणि जि.प.मुख्यकार्यपालन अधिकारी उदय चौधरी यंत्रणेसह सेलू तालुक्यातील नवरगाव(हेटी) या दुर्गम शुक्रवारी सायंकाळी दाखल झाले. त्यांनी जनतेत मिसळून त्यांच्या समस्या ऐकूण घेतल्या. या निमित्त शासन आपल्या दारी अवतरल्याचा अनुभव गावकऱ्यांना आला. जिल्हाधिकाऱ्यांसह व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी संयज भागवत, वर्धेचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, सहाय्यक मुख्य वनसंरक्षक अधिकारी शरद करे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सावंत तसेच सेलूच्या तहसीलदार प्रियदर्शिनी बोरकर, नायब तहसीलदार सुभाष यादव, अजय झिले व बोर अभयारण्याच्या वनपरिक्षेत्र अधिकारी भिंगारे यांचा ताफा शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता गावात दाखल झाला. यावेळी गावातील सरपंच गिता कडूकर, उपसरपंच, पोलीस पाटील तसेच गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. नायब तहसीलदार सुभाष यादव यांनी या मागचा हेतू समजावून सांगितला. जिल्हाधिकारी सोना व सीईओ चौधरी यांनी चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांनीही विविध समस्या पोटतिडकीने मांडून त्या सोडविण्याची अपेक्षा व्यक्त केली. सीईओ चौधरी यांनी राजीव गांधी जीवनदायी योजनेची माहिती दिली. या योजनेचे कार्ड वाटप करण्याच्या सूचना संबंधीत ग्रामसेवकांना दिल्या. अप्पर जिल्हाधिकारी भागवत यांनी आम आदमी विमा योजनेची माहिती देत अर्ज भरण्याचे आवाहन केले. गावकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण लवकर होईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले.(तालुका प्रतिनिधी)