लोकमत न्यूज नेटवर्कबोरधरण : बोरधरण येथील गेट ३ मधून पाच ते सहा दिवसापासून गेटच्या खालून पाण्याचा विसर्गत होत आहे. याकडे मात्र अधिकारी याचे दुर्लक्ष होत आहे. यावर्षी बोरधरण ८०.८० टक्के भरले आहे. पाण्याचा असाच विसर्ग होत राहिल्यास बोरधरणाची पातळी झपाट्याने कमी होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील सर्वच धरणे भरुन वाहत आहेत. बोरधरण जिल्ह्यातील एक मात्र केवळ ८० टक्केच भरले आहे. जर पाण्याचा असाच विसर्ग सुरू राहिल्यास बोरधरणाची पातळी काही दिवसातच खालावण्याची शक्यता आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी मात्र बोरधरणाकडे कधी फिरकतच नाही. जेव्हा मोठया अधिकाऱ्यांची बोरधरणाला भेट असते. तेव्हाच सर्व अधिकारी बोरधरण येथे येतात. पण बाकी दिवस येथील परिस्थिती रामभरोसे असतात. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन बोरधरणातून होणाऱ्या पाण्याचा विसर्ग बंद करावा, आणि यात दोषी असलेल्या अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहे.पाण्याचा अपव्ययमागील वर्षीच्या अल्प पावसामुळे उन्हाळ्यात धरणांची पातळी चांलीच खालावली होती. वर्धेकरांसह इतरांनाही उन्हाळ्यात पाण्याकरिता दाहीदिशा भटकावे लागले. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्याची गरज असतानाही बोरधरणाच्या गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
धरणाच्या गेट खालून पाण्याचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:00 IST
जिल्ह्यातील सर्वच धरणे भरुन वाहत आहेत. बोरधरण जिल्ह्यातील एक मात्र केवळ ८० टक्केच भरले आहे. जर पाण्याचा असाच विसर्ग सुरू राहिल्यास बोरधरणाची पातळी काही दिवसातच खालावण्याची शक्यता आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी मात्र बोरधरणाकडे कधी फिरकतच नाही. जेव्हा मोठया अधिकाऱ्यांची बोरधरणाला भेट असते.
धरणाच्या गेट खालून पाण्याचा विसर्ग
ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : सहा दिवसांपासून वाहताहेत पाणी