शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
7
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
8
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
9
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
10
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
11
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
12
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
13
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
14
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
15
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
16
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
17
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
18
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
19
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
Daily Top 2Weekly Top 5

निराधार योजनेच्या लाभासाठी अपंग समीरची फरफट

By admin | Updated: August 11, 2015 03:09 IST

गलेलठ्ठ पगार कमविणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कुणाचेही सोयरसुतक नसते. याचा प्रत्यय गावात येत

विरूळ (आकाजी) : गलेलठ्ठ पगार कमविणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कुणाचेही सोयरसुतक नसते. याचा प्रत्यय गावात येत आहे. गत दीड वर्षापासून तहसील कार्यालयात चकरा मारणाऱ्या अपंग समीरला अद्यापही निराधार योजनेचा लाभ देण्यात आला नाही. यामुळे सदर कुटुंबाची वाताहत होत असून याकडे लक्ष देत त्याची फरफट थांबवावी, अशी मागणी होत आहे.येथील कुंभार समाजात जन्मलेला समीर मानकर याची घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. यातही समीर लहानपणापासून अपंग आले. त्याला व्यवस्थित चालता येत नाही व बोलताही येत नाही. आई-वडील त्याला उचलून नेऊन त्याची दिनचर्या पूर्ण करतात. गावात शाळा असल्याने तो कसा-बसा दहावीपर्यंत शिकला. अपंगत्वाचा त्रास वाढल्याने त्याला शाळा सोडावी लागली. आता तो अपंगत्वाच्या वेदना सहन करीत खितपत जगत आहे. शासनाच्या अपंगांकरिता अनेक योजना आहेत; पण कामचुकार अधिकाऱ्यांमुळे अपंगांना लाभ मिळत नाही. गत काही वर्षांपासून अपंगांसाठी निराधार योजना सुरू करण्यात आली. या निराधार योजनेचा लाभ आपल्या मुलास मिळावा म्हणून समीरच्या वडिलांनी एक वर्षापूर्वी आर्वी तहसील कार्यालयात अर्ज केला. आज ना उद्या आपल्या मुलाचे निराधार योजनेचे पैसे येतील, अशी अपेक्षा होती. सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही पैसे न आल्याने त्यांनी दुसऱ्यांदा आर्वी तहसील कार्यालयात अर्ज सादर केला. तब्बल एक वर्षाचा काळ लोटूनही अपंग समीरची निराधार योजना सुरू झाली नाही. त्याचे आई-वडील एक वर्षापासून तहसील कार्यालयाच्या चकरा मारत आहे. मुलाला होणाऱ्या त्रासाची माहिती तहसीलदारांची भेट घेत देण्यात आली. यावरून कारवाई करतो, असे सांगितले; पण अद्याप समीरला त्या योजनेचा लाभ मिळाला नाही. आर्वी तहसील कार्यालयात दलालांमार्फत पैसे देऊन अर्ज केला की लगेच निराधार योजना सुरू होते; पण समीरसारख्या गरीब व अपंग व्यक्तीला एक वर्षापासून निराधार योजनेचा लाभ मिळू नये, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. वरिष्ठांनी याकडे लक्ष देत १०० टक्के अपंग असलेल्या समीर मानकर यास निराधार योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.(वार्ताहर)