शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

अद्ययावत तंत्रज्ञान व कार्यकुशलतेने विद्यार्थी बनले कल्पक

By admin | Updated: October 3, 2016 00:50 IST

अद्यावत तंत्रज्ञानाचा झपाट्याने विस्तार होतोय. नव तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांत कार्यकुशलता निर्माण होत असून कल्पकतेचे बिज

भूवन धीर : राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र, बदलत्या तंत्रज्ञानाचा घेतला आढावावर्धा : अद्यावत तंत्रज्ञानाचा झपाट्याने विस्तार होतोय. नव तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांत कार्यकुशलता निर्माण होत असून कल्पकतेचे बिज नव्या तंत्रज्ञानामुळे रोवल्या जात असल्याचे प्रतिपादन भुवन धीर यांनी केले. बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशनच्या वतीने अ‍ॅप्लीकेशन आॅफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग यावर राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आले. उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. एम.ए. गायकवाड, डॉ. एम.डी. चौधरी, प्रा. यु.डी. गुल्हाणे, प्रा. आर.जे. डहाके, ए.एम.ई.चे समन्वयक डॉ. एम.जे. शेख, प्रा.आर.बी. साळवे, प्रा. निखिल बडोले उपस्थित होते. पुढे बोलताना धीर म्हणाले, मेकॅनिकल इंजिनिअरीण्ग क्षेत्रात मोठे परीवर्तन होत आहे. हे नवे बदल स्वीकारून अद्यावत तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास केला पाहिजे. या क्षेत्रात नाविण्यतेला भरपूर वाव आहे. कल्पकतेची दृष्टी ठेऊन नवतंत्रज्ञान विकसित करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यायला हवा असे ते म्हणाले. एम.डी. चौधरी, विभागप्रमुख प्रा. गुल्हाणे यांनी नव तंत्रज्ञानावर प्रकाश टाकताना नव तंत्रज्ञान मेकॅनिकल इंजि. साठी वरदान असल्याचे सांगितले. डॉ. शेख यांनी चर्चासत्राची रूपरेषा विशद केली. चर्चासत्रात देशभरातून ३०४ विद्यार्थ्यांनी शोधनिबंध सादर केलेत. समारोपीय सत्रात उत्तम व्हॅल्यू स्टिल चे उपव्यवस्थापक विवके श्रोती, प्राचार्य डॉ. गायकवाड, डॉ. चौधरी, प्रा. गुल्हाणे, डॉ. शेख, प्रा. राजेश साळवे, प्रा. फुलमाळी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्रोती यांनी विद्यार्थ्यांना अद्यावत तंत्रज्ञानावर भर देण्याविषयी मार्गदर्शन केले. स्किल बेस नॉलेज ही काळाची गरज आहे. त्यामुळे चांगला अभियंता म्हणून समोर येताना गुणवत्ता असणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. मान्यवरांनी राष्ट्रीय चर्चासत्र निश्चितच विद्यार्थ्यांच्या भविष्याकरिता मार्गदर्शक ठरेल असा सांगितले. चर्चासत्राला विविध शाखेचे विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)