घरफोड्या करणाऱ्या टोळीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 22:18 IST2019-06-06T22:17:49+5:302019-06-06T22:18:32+5:30
शहरातील बंद घरांना लक्ष्य करीत हात साफ करणाºया टोळीला रामनगर पोलिसांनी रत्नागिरीतून जेरबंद केले आहे. अटकेतील तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

घरफोड्या करणाऱ्या टोळीला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील बंद घरांना लक्ष्य करीत हात साफ करणाºया टोळीला रामनगर पोलिसांनी रत्नागिरीतून जेरबंद केले आहे. अटकेतील तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मागील दोन ते तीन महिन्यात चोरट्यांनी शहरात चांगलीच दहशत माजविली होती. फेब्रुवारी महिन्यात खडसे ले-आऊटमधील अष्टविनायक अपार्टमेंटमध्ये राहणाºया राहुल कासारे यांच्या घरी पहिली घरफोडी केली. त्यानंतर नालवाडीतील बँक आॅफ इंडिया कॉलनीतील रहिवासी माधुरी पटकोटवार यांच्या घरी दुसरी घडफोडी केली. या दोन्ही घरातून चोरट्यांनी १८ तोळे सोने व १२ हजारांची रोख लंपास केली होती. रामनगर पोलिसांनी तपासचक्र फिरवत चिंतामण मोरे (३८), जयप्रकाश राजराम यादव (३०) व अजय प्रताप पाटवार (२४) सर्व राहणार धुळे यांना रत्नागिरीतून अटक केली. या चोरट्यांकडून पोलिसांनी चोरीतील १ लाख ७५ हजार रुपयांचे सोने हस्तगत केले. तिघांनाही न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यामुळे आणखी चोºया उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.