देऊरवाडा, खडका चेकपोस्टची ख्याती सात जिल्हा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 05:00 AM2020-07-05T05:00:00+5:302020-07-05T05:00:17+5:30

देऊरवाडा येथील पोलीस तपासणी नाक्यावर फौजदार तावडे आणि त्यांचे पथक कार्यरत आहे. त्यामुळे देउरवाडा आणि तळेगांव पोलिसांची अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेली चेकपोस्टची सात जिल्ह्याच्या पार ख्याती पोहचली आहे. कारण या ठिकाणी असलेले पोलीस कर्मचारी, अधिकारी बाहेर जिल्ह्यातून तसेच विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश घेत असलेल्या नागरिकांना परत पाठविण्याचे काम अहोरात्र करीत आहे.

Deorwada, the reputation of Khadka checkpost across seven districts | देऊरवाडा, खडका चेकपोस्टची ख्याती सात जिल्हा पार

देऊरवाडा, खडका चेकपोस्टची ख्याती सात जिल्हा पार

googlenewsNext
ठळक मुद्देकडक अंमलबजावणीमुळे नागरिक सुरक्षित

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी /देऊरवाडा : देऊरवाडा खडका हे वर्धा नदी काठावरचे गाव, वर्धा नदीच्या इकडे वर्धा जिल्हा तर पलिकडे रेड हॉट स्पॉट समजला जाणारा अमरावती जिल्हा.
देऊरवाडा येथील पोलीस तपासणी नाक्यावर फौजदार तावडे आणि त्यांचे पथक कार्यरत आहे. त्यामुळे देउरवाडा आणि तळेगांव पोलिसांची अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेली चेकपोस्टची सात जिल्ह्याच्या पार ख्याती पोहचली आहे. कारण या ठिकाणी असलेले पोलीस कर्मचारी, अधिकारी बाहेर जिल्ह्यातून तसेच विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश घेत असलेल्या नागरिकांना परत पाठविण्याचे काम अहोरात्र करीत आहे. अनाधिकृतपणे येत कोणीही विनापरवाना आता वर्धा जिल्हयाच्या हद्दीत घुसण्याचा साधा प्रयत्न सुद्धा करताना दिसत नसल्याने देऊरवाडा, आर्वी तळेगांव परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. या चेकपोस्टवर बाहेरून आलेल्या व वर्धा जिल्ह्यात प्रवेश घेत असलेल्या नागरिकांना सरळ जेथून आले त्या ठिकाणी परत पाठविण्यात येत असल्याने नागरिकांना सुद्धा एक वळण लागत असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी कोणीही छुप्या मार्गाने जिल्ह्यात येत असल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली होती. पण देऊरवाडा आणि खडका चेकपोस्ट वर पोलिसांच्यावतीने अत्यंत कठोर पावले उचलली जात असल्याने देउरवाडा (आर्वी) आणि तळेगांव सभोवतालचा मोठा परिसर सुरक्षित झाला आहे. कारण कोणीही जर अनधिकृत जिल्हयात प्रवेश घेतला व नंतर तो इसम कोरोना बाधित आढळला तर इतर सोपस्कर पार पाडतांना महसूल व पोलिस प्रशासनालाच खूप त्रास होतो. कोरोना रुग्ण आढळण्याच्या आधी सर्वात मोठी खबरदारी म्हणून या चेकपोस्टवरील पोलीस अधिकारी, कर्मचारी काळजी घेत असल्याचे खरे कोरोना योद्धा ठरले आहे.

Web Title: Deorwada, the reputation of Khadka checkpost across seven districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.