शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

आदिवासींच्या हक्कासाठी धरणे-आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 10:27 PM

आदिवासींच्या संविधानिक न्याय व हक्कासाठी एस.सी., एस.टी. शिक्षण हक्क परिषदेच्यावतीने बुधवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे-आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देशिक्षण हक्क परिषदेच्या विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आदिवासींच्या संविधानिक न्याय व हक्कासाठी एस.सी., एस.टी. शिक्षण हक्क परिषदेच्यावतीने बुधवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे-आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.सन २०१५-१६ पर्यंतची थकीत सुवर्ण जयंती आदिवासी शिष्यवृत्ती व भारत सरकार शिष्यवृत्ती योजना त्वरीत वितरीत करावी. महा डी.बी.टी.योजना त्वरीत बंद करावी. वसतीगृहातील विद्यार्थ्यांची जेवनाची व्यवस्था पूर्वी प्रमाणे वसतीगृहात करण्यात यावी. आदिवासी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची उत्पन्न मर्यादा १ लाख ८ हजार रद्द करुन किमान ८ लाख करावी. पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयं योजनेची ताबडतोब अंमलबजावणी करावी. बार्टीच्या धर्तीवर टी.आर.टी.आय.पुणेच्या मार्फत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा व तत्सम मार्गदर्शन केंद्र जिल्हा पातळीवर सुुरू करावे. आदिवासी संदर्भात जात पडताळणी कार्यालय व आदिवासी प्रकल्प कार्यालय वर्धेत सुरु करावे. बंद पडलेल्या शासकीय आश्रमशाळेत तालुका व जिल्हा पातळीवर एकलव्य इंग्रजी शाळा सुरु करण्यात यावी. आदिवासी विभागामार्फत महिला बचत गट, शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादन कंपनी, लघुउद्योग, कुटीर उद्योग याकरिता एन.बी.अंतर्गत प्रशिक्षण देऊन निधी उपलब्ध करुन द्यावा.शबरी घरकुल योजनेचा लक्षांक किमान १ हजार करण्यात यावा. आदिवासी गावांमध्ये तसेच तालुका व जिल्हा ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत समाज भवन सांस्कृतिक कलाभवन देण्यात यावे. यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात जिल्हा संयोजक मारोती उईके, रविंद्र थुल, महिला संघटिका डॉ.ज्योती लुंगे, अरविंद खैरकार यांच्या नेतृत्वात महेंद्र शिंदे, शंकर सराटे, उदाराम कन्नाके, किसन वाघमारे, पुंडलीक उईके, अनु सुमन बडा, शिला मून, पद्माकर कांबळे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. या मागण्यांचे निवेदन संबंधित मंत्र्यांसह विभागाला पाठविण्यात आले. या आंदोलन मंडपाला महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.चारुलता टोकस, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनिल कोल्हे, शहर अध्यक्ष सुधीर पांगूळ, माजी सभापती लक्ष्मण कांबळे, अनिकेत भोयर, सुरेश राऊत व आकाश बोंदाडे यांनी भेट दिली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीEducationशिक्षण