शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
3
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
4
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
5
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
6
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
7
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
8
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
9
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
10
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
11
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
12
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
13
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
14
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
15
मराठा समाजासाठी आमच्या एवढे काम कोणी केले नाही काेणतीही याेजना बंद नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
16
माणसांची सुट्टी! एआय स्वतःच स्वतःला देणार जन्म; 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'ला मोठा निधी
17
केरळमध्ये सतीशन यांचा 'अल्ट्रा मॉडर्न' फॉर्म्युला! २० पैकी १४ मंत्री नवे चेहरे, आज शपथविधी होणार
18
भारत-नेदरलँड्स यांच्यात १७ करारांवर स्वाक्षऱ्या; पंतप्रधान मोदी-रॉब जेटेन यांच्यात धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा
19
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
20
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
Daily Top 2Weekly Top 5

शेडनेट व पॉलिहाऊस ठरली कर्जबाजारी करणारी योजना

By admin | Updated: April 19, 2016 05:57 IST

विदर्भातील शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन घेण्याकरिता शेडनेट व पॉलिहाऊस देण्याचा निर्णय शासनाने घेतला. याकरिता

वर्धा : विदर्भातील शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन घेण्याकरिता शेडनेट व पॉलिहाऊस देण्याचा निर्णय शासनाने घेतला. याकरिता कृषी विभागामार्फत विविध योजना अंमलात आणून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले; मात्र हे शेडनेट व पॉलिहाऊस विदर्भातील शेतकऱ्यांना आत्महत्यांपासून परावृत्त करण्याऐवजी ही योजना त्यांना कर्जबारी करण्याचे एक माध्यम ठरले, असा आरोप किसान अधिकार अभियानच्या अधिकरात तयार झालेल्या शेडनेट पॉलिहाऊस शेती उत्पादक आंदोलन समितीने सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
शासनाच्या योजनेने कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती जाहीर करावी या मागणीकरिता आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, कृषिमंत्री, सहकारमंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रात उदयास आलेल्या या योजनेने विदर्भातील शेतकऱ्यांना लुबाडल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
विदर्भातील शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हायटेक शेती करावी असे म्हणत २००९-१० पासून शेडनेट पॉलिहाऊस ही योजना अंमलात आणली. याकरिता शेतकऱ्यांना पुणे विभागात तळेगाव (दाभाडे) येथे प्रशिक्षण देत राष्ट्रीयकृत बॅँकांच्या मार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. प्रारंभी शेतकऱ्यांना मोठ्या कमाईचे स्वप्न दाखविण्यात येत होता. या योजनेत शासनाच्या कृषी विभागामार्फत युवा शेतकऱ्यांना गत पाच-सहा वर्षात या योजनेकडे आकर्षित करण्यात आले. प्रारंभी दिखाव्याने भुरळून गेलेल्या युवा शेतकऱ्यांना आता ही योजना आपल्याकरिता फसवी ठरत असल्याचे दिसत आहे.
योजनेकरिता बॅँकेतून घेतलेल्या कर्जावरील भक्कम व्याजदर, बाजारातील पडले भाव, विम्याची अनिश्चितता, विदर्भातील उत्पादनात विषम तापमान, वारा-वादळांचा प्रकोप, बियाणे- औषधींच्या अनिर्बंध किमती, शासनाच्या वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शनाची कमतरता, फुलं, फळं व भाज्या टिकविण्याची वातानुकूलित व्यवस्था जिल्ह्यात कुठेही नाही. शेडनेट पॉलिहाऊस शेती उत्पादक शेतकरी या समस्यांमुळे चार-पाच वर्षात त्रस्त झाले. प्रशासनातील कृषी विभाग, विमा कंपनी, बॅँक त्यांना कुठलीही मदत करायला तयार नाही. जवळपास सर्वच शेडनेट, पॉलिहाऊस शेती उत्पादक कर्जाच्या ओझ्याखाली दबून आहेत.
यावेळी किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे यांच्यासह समितीचे उपाध्यक्ष गोपाळ वंगळ, उपाध्यक्ष कार्याध्यक्ष अजिंक्य घवघवे, सचिव अजय डेकाटे, सहसचिव सचिन शेंडे, विठ्ठल वानोडे, विनायक गाकरे, राजेश थोरात, मनीष झोटिंग व कोषाध्यक्ष बादल बुचे यांच्यासह समिती सदस्य मंगेश सावरकर, संजय ठाकरे, पद्माकर पाठे, अविनाश काहाते, विक्रांत बिजवार, अविनाश राऊत, त्र्यंबकराव माहुरे, लता अवचट यांचा सहभाग होता.(प्रतिनिधी)

अन्यायाविरोधात
लढ्याकरिता समिती
४जिल्ह्यातील या शेडनेट पॉलिहाऊस उत्पादक शेतकऱ्यांवर झालेल्या व होत असलेल्या अन्यायातून सुटका करण्यासाठी शासन, प्रशासन व न्याय व्यवस्थेकडून न्यायाची प्राप्ती करण्यासाठी संघर्षाची गरज आहे. याकरिता किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे यांच्या नेतृत्त्वात किसान अधिकार अभियान अंतर्गत ‘शेडनेट पॉलिहाऊस शेती उत्पादक आंदोलन समिती’ स्थापन केली केली आहे.