कर्जमुक्ती हा दिलासा देण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 05:00 AM2020-01-28T05:00:00+5:302020-01-28T05:00:06+5:30

भारतीय प्रजासत्ताकाचा वर्धापनदिन सोहळा जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर पार पडला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर जि. प.अध्यक्ष सरिता गाखरे, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, जि.प. उपाध्यक्ष वैशाली येरावार, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Debt relief is an attempt to give comfort | कर्जमुक्ती हा दिलासा देण्याचा प्रयत्न

कर्जमुक्ती हा दिलासा देण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देपालकमंत्री : विविध ग्रामपंचायती आणि सामाजिक संस्थांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अतिशय वाईट परिस्थितीतून जाणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने कर्जमुक्ती देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबतच शेतकऱ्याला अधिक बळकट करणे तसेच आणखी सवलती देण्याची गरज आहे. त्यादृष्टीने हे सरकार अग्रणी राहणार आहे, असे प्रतिपादन पशु संवर्धन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताकाचा वर्धापनदिन सोहळा जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर पार पडला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर जि. प.अध्यक्ष सरिता गाखरे, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, जि.प. उपाध्यक्ष वैशाली येरावार, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. ना. केदार यांनी परेड निरीक्षण करुन सर्व स्वातंत्र संग्राम सैनिक आणि शहीदांना अभिवादन केले. याप्रसंगी गृहविभाग, गृहरक्षक, एन.सी.सी., स्काऊटस्-गाईडस् पथकांनी पथसंचलन करुन मान्यवरांना मानवंदना दिली. तसेच वन विभागाच्यावतीने वृक्ष लागवड योजनेवर उत्कृष्ट झाकी, आपात कालीन वैद्यकीय सेवा, पोलीस विभागाचे श्वान पथक, दंगल नियंत्रण व वज्र वाहन पथक, आदी चित्ररथाव्दारे जनजागृतीपर संदेश देण्यात आला. कार्यक्रमादरम्यान पालकमंत्र्याच्या हस्ते शहीद जवान प्रेमदास मेंढे यांच्या परिवाराला २५ हजार रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत पुरस्कार प्राप्त झालेल्या आर्वी तालुक्यातील मिर्झापूर (नेरी) ग्रा. पं.ला पाच लाखांचा प्रथम, हिंगणघाट तालुक्यातील जांगोणा ग्रा.पं. ला तीन लाखांचा द्वितीय तर काचनगाव ग्रा.पं.ला दोन लाखांचा तृतीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर उल्लेखनीय कामाबद्दल मोहीत सहारे व आंकाशा काकडे यांना १० हजार रुपये आणि अध्ययन भारती संस्थेला ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. वयोवृद्ध आंतरराष्ट्रीय धावपटू जानराव लोणकर यांना प्रमाणपत्र व सन्माचिन्ह देऊन गौरविण्यात आले. लोकसभा व विधानसभा निवडणुका जिल्हा प्रशासनाने शांत व निभर्य वातावरणात पार पाडल्याबाबत जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांचा सन्मानचित्र देऊन सत्कार करण्यात आला. स्काऊटस्- गाईडस्च्या साक्षी चौधरी, शासकीय उत्कृष्ट कामगिरी बाबत जलसंपदा विभागाचे कर्मचारी साहेबराव गोडे, गुणवत्त खेळाडू श्रद्धा जनार्धन शिरपूरकर, पुजेश नितीन डफळे, राजेश उमरेही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. संचालन अतुल राजपायले यांनी केले.

Web Title: Debt relief is an attempt to give comfort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी