शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनची मळणी धोक्यात

By admin | Updated: October 3, 2016 00:36 IST

जिल्ह्यात गत आठवड्यापासून दररोच पाऊस येत आहे. या पावसामुळे मळणीवर आलेले सोयाबीन धोक्यात आले आहे.

सततच्या पावसाने शेतात चिखल : शेंगा फुटण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेतवर्धा : जिल्ह्यात गत आठवड्यापासून दररोच पाऊस येत आहे. या पावसामुळे मळणीवर आलेले सोयाबीन धोक्यात आले आहे. शेतात चिखल होत असल्याने सोयाबीनची मळणी रखडली आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास उत्पन्नात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. पावसाळ्याच्या मृग नक्षत्रापासून निसर्गाने उत्तरा नक्षत्रापर्यंत शेतकऱ्यांना साथ दिली; पण उत्तरा नक्षत्र सुरू होतात पाऊस लागून पडल्याने सोयाबीन पिकाची मळणी धोक्यात आली. सोयाबीनच्या शेंगा दाण्यांनी भरल्या असून मळणीला विलंब झाल्यास त्या फुटून त्यातील दाणे खाली पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करण्याची भीती त्यांच्या मनात घर करीत असल्याचे दिसत आहे. हातात आलेले पीक पोत्यात जाण्याअगोदर ते खाली तर जाणार नाही ना, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सतत सुरू असलेला पाऊस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढविणारा ठरत आहे. सोयाबीन कापणीचे दिवस येताच २६ सप्टेंबरपासून हस्त नक्षत्राला प्रारंभ झाला अन् मुसळधार पावसाच्या सरी सुरू झाल्या. यामुळे कापणीस आलेले शेतातच उभे असलेल्या सोयाबीनच्या शेंगा उन्ह तापताच फुटण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनात असतानाच शेंगांना झाडावरच अंकूर फुटत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नुकसानाचा सामना करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)