शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
6
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
7
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
8
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
9
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
10
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
11
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
12
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
13
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
14
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
15
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
16
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
17
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
18
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
19
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
20
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांच्या परवानगीविनाच दलित वस्तीची कामे

By admin | Updated: June 21, 2017 00:40 IST

ग्रामीण भागात असलेल्या दलित वस्तीतील रहिवाशांना नागरी सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने कामे

९ कोटींचा खर्च : पूर्ण व अपूर्ण कामाचा अहवाल नाही रूपेश खैरी। लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : ग्रामीण भागात असलेल्या दलित वस्तीतील रहिवाशांना नागरी सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने कामे करण्याकरिता एकूण ९ कोटी २९ लाख ९० हजार ७०० रुपयांची तरतुद करण्यात आली. यातून आठही पंचायत समितीला प्रत्येकी १ लाख ३ हजार ३२ हजार ३०० रुपये देण्यात आली. या रकमेतून कामे करण्यात आली; मात्र ही कामे करताना समाजकल्याणच्या प्रादेशिक आयुक्तांची परवानगी घेणे आवश्यक असताना तसे झाले नाही. यामुळे झालेली कामे अवैध ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे या कामांत झालेल्या ५ कोटी ९३ लाख ४० हजार ९९० रुपयांचा खर्चच अमान्य करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांपैकी दलित वस्ती विकास ही योजना आहे. या योजनेकरिता शासनाकडून भरघोस अनुदान मिळते. शिवाय जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेच्यामाध्यमातूनही यात रक्कम दिल्या जाते. या रकमेतून जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या दलित वस्तींचा विकास साधण्यात येतो. वर्धेतही याच योजनेतून अनेक कामे करण्यात आली. मात्र ही कामे करताना नियमांना बगल देण्यात आल्याने या कामांत मोठ्या प्रमाणात गौडबंगाल होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेकडून या योजनेत एकूण २९६ कामे करण्यात आल्याचे नमूद आहे. मात्र ही कामे करताना समाजकल्याण उपायुक्तांची रितसर परवानगी घेणे आवश्यक असताना तसे झाले नाही. शिवाय या कामांपैकी किती कामे झाली आणि आजच्या घडीला किती कामे अपूर्ण आहेत, याची कुठलीही नोंद नसल्याचे दिसून आले आहे. या योजनेत मंजूर झालेल्या कामांपैकी सात कामे रद्द करण्यात आली आहेत. यात सन २००९-१०, २०१०-११, २०११-१२, २०१२-१३ व २०१३-१४ या कालावधीतील कामांचा समावेश आहे. रद्द झालेल्या या कामांवरील खर्चाची जबाबदारी निश्चित होणे अपेक्षित होते. ही कामे रद्द होवून मोठा कालावधी झाला तरी त्यांवर होणाऱ्या खर्चाची निश्चिती अद्यापही समाजकल्याण विभागाच्यावतीने करण्यात आली नाही. शिवाय कामांकरिता वितरीत करण्यात आलेल्या रकमेच्या उपयोगितेचे प्रमाणपत्रही सादर करण्यात आले नाही. यातही विशेष बाब म्हणजे मंजूर झालेल्या कामांची देयके अदा करण्यात आली; मात्र त्यावर समाजकल्याण अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नसल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले आहे. यामुळे या कामांत मोठ्या प्रमाणात घोळाची शक्यता आहे. यामुळे लेखापरीक्षण अहवालानुसार या कामांची चौकशी होणे गरजेचे आहे. रोख पुस्तिकेत खर्च मात्र सादर दलित वस्तीच्या कामांवर झालेल्या खर्चाची नोंद रोखपुस्तिकेवर झाली आहे. ही नोंद करताना समाजकल्याण विभागाच्यावतीने चौकशी करणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. यामुळे या कामांत विभागातील काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता नाकरता येत नाही. कार्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संगनमतानेच हा प्रकार झाला अथवा यात कुण्या पदाधिकाऱ्याचा हात आहे, याची चौकशी होणे गरजेचे झाले आहे.