शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्त समाज घडविणे काळाची गरज

By admin | Updated: March 2, 2017 00:39 IST

व्यसन ही मानवी जीवनाला लागणारी किड आहे. ज्यामुळे अनेक सुखी कुटुंबाची दुर्दशा होते.

तुकाराम घोडे : व्यसनमुक्त समाज जागृती अभियान वर्धा : व्यसन ही मानवी जीवनाला लागणारी किड आहे. ज्यामुळे अनेक सुखी कुटुंबाची दुर्दशा होते. आर्थिक व सामाजिक ऱ्हास होतो. वर्धा जिल्हा दारूबंदी घोषित झाला असताना मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेली दारू हा चिंतेचा विषय ठरू शकतो. यासाठी प्रबोधन करणे व सामाजिक चळवळ उभी करणे अत्यंत गरजेचे बाब झाले आहे, असे मत कीर्तनकार तुकाराम घोडे महाराज यांनी व्यक्त केले. सेक्युलर फ्रंट, तथागत बुद्ध विहार मांडवा, आर्या मार्शल आर्ट असोसिएशन, लॉयन्स क्लब गांधी सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने झेंडा चौक, मांडवा येथे व्यसनमुक्त समाज जागृती अभियानानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहन अग्रवाल होते. उद्घाटक पोलीस उपअधीक्षक रविंद्र किल्लेकर, मांडव्याचे सरपंच आरती देशमुख, ठाणेदार संतोष शेगावकर, प्रा. मोहन गुजरकर, अनिल नरेडी, सुनील बुरांडे, माजी शिक्षणाधिकारी लक्ष्मीनारायण सोनवणे, रमेश केला, दक्ष फाउंडेशनचे प्रकाश खंडार, व्यंकट बुंदे, जी.जी. प्रधान, संजय धनुषकर, विजयकुमार नाखले, शंकर मोहड, एकनाथ उरकुडे, हरीष तांदळे, रमेश भगत, पवन परियाल, भगवान आहुजा, दिलीप ढोमणे, सेक्युलर फ्रंटचे इमरान राही मंचावर उपस्थित होते. देशातील युवा पिढीचा पश्चिमी संस्कृतीकडे ओढा वाढत आहे. आधुनिकतेची भुरळ पडली आहे. फॅशनच्या नादात स्वैराचाराच्या विळख्यात सापडून ही पिढी व्यसनाधीन बनत आहे. देशाचे आधारस्तंभ व्यसनाच्या गर्तेत अडकले आहे. त्यांना बाहेर काढणे गरजेचे आहे, असे मत इमरान राही यांनी व्यक्त केले. यावेळी दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्ष अंजना वाडेकर, तंटामुक्ती समितीच्या संगीता मसराम यांचा पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संचालन विशाखा ससे, मनीषा खैरकार, भारती वाडेकर यांनी तर आभार हरीष तांदळे यांनी मानले.(स्थानिक प्रतिनिधी)