शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

राज्य परिवहन महामंडळात नेमले जाणार समुपदेशक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 3:56 PM

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी विशेषत: चालकांवर प्रवासी बस चालविताना सतत मानसिक त्रास येत असल्याने त्याची परिणीती गंभीर प्रसंगामध्ये होवू शकते. हे टाळण्याच्या उद्देशाने चालकाचे समुपदेशन करण्यासाठी ३, ४ आगारांकरिता समुपदेशन मानधन तत्वावर नेमण्यात येणार आहे.

ठळक मुद्देएक वर्षासाठी नियुक्ती

आॅनलाईन लोकमतवर्धा : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी विशेषत: चालकांवर प्रवासी बस चालविताना सतत मानसिक त्रास येत असल्याने त्याची परिणीती गंभीर प्रसंगामध्ये होवू शकते. हे टाळण्याच्या उद्देशाने चालकाचे समुपदेशन करण्यासाठी ३, ४ आगारांकरिता समुपदेशन मानधन तत्वावर नेमण्यात येणार आहे. यासंदर्भातील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.समुपदेशक तीन ते चार आगारांकरिता एक या पध्दतीवर राहणार असून प्रत्येक आगारास महिन्यातून तीन भेटी ते देणार आहेत. यात चालक पदातील कर्मचाऱ्यांशी व्यक्तीगत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी दुर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. १ वर्षाच्या कालावधीसाठी ही नियुक्ती राहणार असून त्यानंतर त्यांना त्यांच्या कामानुसार वाढ देण्याबाबत विचार केला जाणार आहे. संपूर्ण राज्यात ६३ समुपदेशक नेमले जाणार आहे. या समुपदेशकांना चार हजार रूपये मानधन व वर्ग एकच्या अधिकाऱ्याला लागू असलेला दैनिक भत्ता दिला जाणार आहे. शिवाय जाण्या-येण्याकरिता राज्य परिवहन महामंडळातून मोफत पास मिळणार आहे. राज्यात मुंबई विभागात ५ आगाराला १ पालघर, ठाणे, रायगड येथे ८ आगाराला प्रत्येकी २ समुपदेशक नियुक्त केले जाणार आहे. याशिवाय रत्नागिरी येथे ९ आगारासाठी २, सिंधुदुर्ग येथे ७ आगारासाठी २, नाशिक येथे १३ आगारासाठी ४, धुळे येथे ९ आगारासाठी २, जळगाव, अहमदनगर येथे प्रत्येकी ११ आगारासाठी ३, ३ समुपदेशक नेमले जाणार आहे. पुणे येथे १२ आगारासाठी ३, सागंली येथे १० आगारासाठी २, सातारा येथे ११ व कोल्हापुर येथे १२ आगारासाठी प्रत्येकी ३ समुपदेशक नेमले जाणार आहे. याशिवाय सोलापुर, औरंगाबाद, नांदेड, बीड, उस्मानाबाद, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, भंडारा, नागपूर विभागात प्रत्येकी २, लातुर, वर्धा, चंद्रपुर, गडचिरोली येथे प्रत्येकी १ समुपदेशक नेमले जाणार आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागातंर्गतही एक समुपदेशक नेमण्याची प्रक्रिया प्रारंभ करण्यात आली आहे. या दृष्टीकोणातून अर्ज मागविण्यात येत आहे. या समुपदेशकांचा कालावधी एक वर्षाचा राहणार असून ते परिवहन महामंडळाच्या आगारांमधील चालक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतील व त्यांच्या अडचणी समजून घेतील.- राजेश अडोकार, विभागीय नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ, वर्धा.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ