शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

११५ शेतकऱ्यांचा कापूस घरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST

नोंदणी केलेल्या तालुक्यातील ११५ शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांनी कापूस विकला काय याची चौकशी शासकीय यंत्रणेकडून करण्यात आल्यावर तब्बल ४२ शेतकऱ्यांच्या घरी कापूस असल्याचे पुढे आले. हा कापूस वेळीच खरेदी केला जाईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. परंतु, नोंदणी करताना या शेतकऱ्यांनी सातबारा जोडला नसल्याचे पुढे आल्याने या कापूस उत्पादकांच्या घरी कापूस शिल्लक आहे. शिवाय त्याची खरेदीही करण्यात आलेली नाही.

ठळक मुद्देखरेदीकडे दुर्लक्ष : कापूस उत्पादकांच्या अडचणीत भर

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : तालुक्यातील ११५ शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी शासनाकडे नोंदणी केली. परंतु, अद्यापही या शेतकऱ्यांचा कापूस शासकीय यंत्रणेने खरेदी न केल्याने या कापूस उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. या शेतकऱ्यांचा कापूस वेळीच खरेदी करण्यात यावा अशी मागणी आहे.नोंदणी केलेल्या तालुक्यातील ११५ शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांनी कापूस विकला काय याची चौकशी शासकीय यंत्रणेकडून करण्यात आल्यावर तब्बल ४२ शेतकऱ्यांच्या घरी कापूस असल्याचे पुढे आले. हा कापूस वेळीच खरेदी केला जाईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. परंतु, नोंदणी करताना या शेतकऱ्यांनी सातबारा जोडला नसल्याचे पुढे आल्याने या कापूस उत्पादकांच्या घरी कापूस शिल्लक आहे. शिवाय त्याची खरेदीही करण्यात आलेली नाही. यापूर्वी तालुक्यातील २,५२१ शेतकऱ्यांनी रितसर नोंदणी करून शासनाला कापूस विकाला आहे. ११५ शेतकऱ्यांच्या घरी कापूस शिल्लक राहिल्याने त्यांनी उपनिबंधक कार्यालयाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीकडे विनंती अर्ज सादर केला. त्यानंतर चौकशी करण्यात आली. पण अजूनही या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात न आल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. मागील महिन्यात शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातील सर्वच नोंदणीकृत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आल्याचा दावा जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता; पण या प्रकरणाने पितळच उघडे पडले आहे.११५ शेतकऱ्यांनी कापूस विकत घेण्याकरिता अर्ज केला होता. त्यापैकी ४२ शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असल्याचे चौकशीत पुढे आले आहे. काही शेतकऱ्यांचे पेरेपत्र आणि सातबारा अर्जासोबत मिळाले नसल्याने ही परिस्थिती ओढावली. येत्या काही दिवसांत या शेतकऱ्यांचा कापूस विकत घेणार आहे.- गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक,वर्धा.तालुक्यातील ११५ शेतकऱ्यांचा कापूस विकत घेण्याकरिता अर्ज आम्हाला प्राप्त झाला. हा अर्ज उपनिबंधक कार्यालयाकडे पाठविण्यात आला. चौकशीअंती यातील यातील ३३ शेतकऱ्यांचा कापूस विकत घेणार असल्याचे अहवालात नमूद आहे. मंजूरी आल्यावर या शेतकऱ्यांचा कापूस मार्केट यार्ड मध्ये बोलावून विकत घेतला जाईल.- विनोद कोटेवार, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, आर्वी.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी