शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कोरोनाबाधित रुग्णाचे रुग्णालयातून पलायन; विहिरीत आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 5:00 AM

आमदार दादाराव केचे यांनी घटनास्थळी जात परिसराची पाहणी केली.विजय उत्तम खोडे रा. बाेरगाव टु. असे मृताचे नाव आहे.   विजय खोडे याची चाचणी केली असता तो पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्याला १४ रोजी आर्वीच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास विजयने रूग्णालयातून पलायन केल्याने एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देआर्वी शहरात एकच खळबळ : उलटसुलट चर्चेला आले उधाण

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रूग्णाने रूग्णालयातून पलायन केले. काही वेळानंतर रूग्णाचा मृतदेह विहिरीत आढळून् आला. या घटनेने शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले असून आत्महत्या की घातपात, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. आमदार दादाराव केचे यांनी घटनास्थळी जात परिसराची पाहणी केली.विजय उत्तम खोडे रा. बाेरगाव टु. असे मृताचे नाव आहे.  विजय खोडे याची चाचणी केली असता तो पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्याला १४ रोजी आर्वीच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास विजयने रूग्णालयातून पलायन केल्याने एकच खळबळ उडाली. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी शोध घेतला असता त्याच्या मोबाईल लोकेशनवरून तो पुलगाव मार्गावरील एका शेतात असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता त्याचा मोबाईल त्या ठिकाणी मिळून आल्याने परिसरात शोध घेतला असता एका विहिरीजवळ त्याचा दुपट्टा दिसून आला. तो दुपट्टा विजयचा असल्याचे त्याच्या भावाने सांगितले.  ठाणेदार संजय गायकवाड, योगेश चहेल, अतुल भोयर, विजय तोडसाम, प्रकाश सानप विहिरीतून पाण्याचा उपसा सुरू केला. पण, पाणी भरपूर असल्याने मृतदेह मिळून आला नव्हता. आमदार दादाराव केचे यांनी याबाबत उपजिल्हा रुग्णालयात रात्री कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. याचा तपास पोलीस करीत असून आत्महत्या की घातपात असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू