आधीच ठप्प बांधकामाला कोरोनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST2020-04-13T05:00:00+5:302020-04-13T05:00:06+5:30

शहरातील सेकंड होमसाठी ग्राहक पुढे यायला लागल्याने जिल्ह्यातील रिअल इस्टेट क्षेत्रात आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, सरकारच्या बदलत्या धोरणामुळे ग्राहकांकडून बुकिंग मिळत नसल्याने अनेक गृहनिर्माण प्रकल्पांचे काम रखडले गेले. त्यानंतर नोटाबंदी आणि जागतिक मंदीच्या कचाट्यात हा व्यवसाय सापडला. दुसरीकडे बांधकामसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या साहित्यामध्ये वाढ झाल्याने साहजिकच फ्लॅटच्या दरामध्ये मोठी वाढ झाली.

Corona hit already jammed construction | आधीच ठप्प बांधकामाला कोरोनाचा फटका

आधीच ठप्प बांधकामाला कोरोनाचा फटका

ठळक मुद्देफ्लॅट, भूखंड विक्रीविना पडून : बांधकाम व्यवसाय थंडावला

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वाढत्या शहरीकरणामुळे जमिनींच्या वाढत्या किंमतीबरोबरच वाळू सिमेंट, स्टील, विजेची उपकरणे यांचे वाढलेले दर, कामगारांच्या मजुरीत झालेली वाढ, नोटाबंदी, जागतिक मंदी तसेच ग्राहकांनी पाठ फिरविल्याने पडून असलेल्या फ्लॅटमुळे आधीच ठप्प झालेला बांधकाम व्यवसाय हा कोरोनामुळेही मोठ्या संकटात सापडला आहे. परिणामी, सध्यातरी बांधकाम व्यवसायिकांनी या व्यवसायाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
शहरातील सेकंड होमसाठी ग्राहक पुढे यायला लागल्याने जिल्ह्यातील रिअल इस्टेट क्षेत्रात आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, सरकारच्या बदलत्या धोरणामुळे ग्राहकांकडून बुकिंग मिळत नसल्याने अनेक गृहनिर्माण प्रकल्पांचे काम रखडले गेले. त्यानंतर नोटाबंदी आणि जागतिक मंदीच्या कचाट्यात हा व्यवसाय सापडला. दुसरीकडे बांधकामसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या साहित्यामध्ये वाढ झाल्याने साहजिकच फ्लॅटच्या दरामध्ये मोठी वाढ झाली. त्यामुळे हे फ्लॅट ग्राहकांना परवडेनासे झाले. त्यांनी याकडे पाठ फिरविल्याने बांधकाम व्यवसाय ठप्प झाला आणि बांधकाम व्यावसायिकांची आर्थिकघडी विस्कटल्याने परिणामी पुढील कामेही ठप्प झाल्याने या व्यवसायात रोजंदरीवर पोट भरणाऱ्यांचीही उपासमार सुरू झाली आहे. त्यातच कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे रोजंदारीवरील काम करणाºया मजुरांना अन्यत्र काम मिळणेही दुरापास्त होऊन बसले असताना दुसरीकडे कोरोनाच्या लॉकडाऊनचा फटका बांधकाम व्यावसायिकांनाही बसल्याने त्यांच्याही आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांची आर्थिक गाडी रूळावर यायला दोन ते तीन वर्षे जातील, असा अंदाज काही बांधकाम व्यावसायिकांनी बोलू दाखविली.

मंदीबरोबरच आता कोरोनाचे सावट
बँकांमधील ठेवीवरील घटणारा व्याजदर आणि सोन्यातील गुंतवणुकीवर आणलेल्या निर्बंधामुळे रिअल इस्टेट गुंतवणूक हा एक चांगला आणि भरघोस रिटर्न देणारा पर्याय मानला जातो. मात्र, फ्लॅटच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने ग्राहकांनी गेल्या दोन वर्षांपासून फ्लॅट, भूखंड खरेदीकडे पाठ फिरविल्याने या व्यवसायात आलेली मंदी आणि कोरोनाचे सावट या चक्रव्युहात बांधकाम व्यवसाय सापडला आहे.

Web Title: Corona hit already jammed construction