शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

शीतलता देणाऱ्या पेयांमुळे अनेकांच्या हातांना काम

By admin | Updated: May 19, 2016 01:46 IST

जिल्ह्यातील तापमानाने ४५ अंशांची सीमा ओलांडली आहे. सूर्य आग ओकू लागला आहे. यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले आहे.

भर उन्हातही होते विक्री : फिरत्या रसवंत्यांचाही आधारपुलगाव : जिल्ह्यातील तापमानाने ४५ अंशांची सीमा ओलांडली आहे. सूर्य आग ओकू लागला आहे. यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले आहे. जीवाची काहिली करणाऱ्या उन्हामुळे शरीराचे उष्णतामान वाढत असून टपरी, ठेल्यावर थंडपेय, ऊसाचा रस, थंडगार बर्फाचे रंगबेरंगी विविध चवीचे आईसगोले, कुल्फी, आईस्क्रीम, लस्सी आदी शीतपेय तहानलेल्या जीवांना शीतलता देत आहे. सोबतच शहर व परप्रांतीय बेराजगारांना रोजगारही मिळाला आहे.सध्या शहरात आईसगोले व आईस डिशचा स्वाद घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे काही प्रमाणात आईस्क्रीम, कुल्फी व रसवंती आदी व्यवसायावर परिणाम जाणवत आहे. शिवाय शहराच्या प्रत्येक भागात फिरत्या रसवंतीच्या हातगाड्याही दिसतात. यामुळे घरपोच ऊसाचा रस, निंबू शरबत, कुल्फी, आईस्क्रीम मिळत आहे. शहरात सुमारे ३५ ते ४० हातगाड्या फिरत असून या माध्यमातून बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड आदी राज्यातील युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. इतकेच नव्हे तर आजच्या बदलत्या परिस्थितीत लग्न समारंभ, मुंज, वाढदिवस आदी अनेक मंगल समारंभात स्वरूची भोजनासोबतच आईसगोला, आईसडिश, कुल्फी, आईस्क्रीम आदींचे स्टॉल लागतात. यामुळे गळ्याला शीतलता देणाऱ्या थंडपेयांची मागणीही वाढली आहे.भगतसिंग चौकात सायंकाळी ५ ते रात्री १० पर्यंत हातगाडीवर आईसगोला साहित्य थाटून बसणारे बब्बूभाई मशिनच्या साह्याने तयार केलेला गोला कम आईस बार व विविध रंग टाकलेली आईसडीश शौकीन मंडळीचे आकर्षण ठरत आहे. इतकेच नव्हे तर या आईसगोला वा आईस डिशसाठी चांगलीच गर्दी होते. शहरातील राम व श्याम या जुळ्या केशरवाणी बंधूंचा जय माता दी नावाने प्रसिद्ध असलेला आईसगोला लग्न समारंभात निमंत्रितांचे लक्ष वेधतो. भर उन्हातही दुपारपासून रात्रीपर्यंत शहरातील विविध भागात थंडपेयाच्या बंड्या शौकिनांना शीतलता बहाल करताना दिसून येतात.(तालुका प्रतिनिधी)