शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडरकरिता इण्डेनसमोर ग्राहकांची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 06:00 IST

इंडियन ऑईल कंपनीकडे सराफ इण्डेन गॅस एजंन्सीचे १३ लाख ५५ हजार ४५० रुपये जमा आहे. परंतु, एजन्सीकडून फिल्ड आफीसर निलेश ठाकरे यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार केली. त्यामुळे या बदल्यातून सिलिंडरचा पुरवठा रोखून ग्राहकांच्या भावनाशी खेळ चालविला. अखेर ग्राहकांना तत्काळ सिलिंडर उपलब्ध करुन देण्याची मागणी कंपनीकडे केल्यानंतर कंपनीकडून सिलिंडर पुरवठा होताच ग्राहकांना सिलिंडर वितरीत करण्यात आले.

ठळक मुद्देसामाजिक अंतराने झाले वितरण : कंपनीच्या अटकावामुळे ओढवली परिस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता शासनाकडून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरु ठेवण्यास सांगितले आहे. मात्र काही दिवसांपासून ग्राहकांना सिलिंडरचा पुरवठा झाला नसल्याने शुक्रवारी सकाळी शहरातील सराफ इण्डेन गॅस एजंन्सीपुढे सिलिंडर घेण्याकरिता ग्राहकांची झुंबड झाली होती. पोलिसांनी मध्यस्तीकरुन सामाजिक अंतराने सिलिंडरचा वाटप करण्यात आला.शहरात इण्डेन गॅसचे मोठे ग्राहक आहे. ग्राहकांना नियमित गॅस सिलिंडर पुरविण्याचे कार्य सराफ इण्डेन कडून केले जाते. लॉकडाऊनच्या काळात उपलब्ध असलेले सिंलिंडर शहरातील ग्राहकांना घरपोच पुरविण्यात आले. मात्र, सराफ इण्डेनकडून फिल्ड ऑफीसरची तक्रार वरिष्ठांकडे केली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांनी बदल्याची भूमिका ठेऊन इडियन ऑईल कंपनीकडून एजंन्सीला सिलिंडरचा पुरवठा केला नाही. त्यामुळे एजंन्सीकडे सिलिंडर उपलब्ध नसल्याने या अडचणीच्या काळात ग्राहकांना सिलिंडर पुरविण्यात अडचणी निर्माण झाल्या. शेवटी एजंन्सीचालकाने कंपनीला येथील परिस्थिती अवगत केल्यानंतर कंपनीकडून सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला. शुक्रवारी सकाळपासूनच ग्राहकांनी सिलिंडर घेण्याकरिता गर्दी केली होती. ही गर्दी टाळण्याकरिता शहर पोलिसांनी धाव घेत शहरातील ग्राहकांना घरपोच सेवा द्यावी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना पुरवठा करण्यात यावा, अशी भूमिका घेतली. त्यामुळे एजंन्सीकडून त्याला सहकार्य करीत ग्रामीण भागातील ग्राहकांना सामाजिक अंतराने सिलिंडरचे वाटप केले. तसेच शहरातील ग्राहकांना सिलिंडेर पोहोचविण्याकरिता वाहने पाठविण्यात आली होती.इंडियन ऑईल कंपनीकडे सराफ इण्डेन गॅस एजंन्सीचे १३ लाख ५५ हजार ४५० रुपये जमा आहे. परंतु, एजन्सीकडून फिल्ड आफीसर निलेश ठाकरे यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार केली. त्यामुळे या बदल्यातून सिलिंडरचा पुरवठा रोखून ग्राहकांच्या भावनाशी खेळ चालविला. अखेर ग्राहकांना तत्काळ सिलिंडर उपलब्ध करुन देण्याची मागणी कंपनीकडे केल्यानंतर कंपनीकडून सिलिंडर पुरवठा होताच ग्राहकांना सिलिंडर वितरीत करण्यात आले. शहरातील ग्राहकांनाही तत्काळ घरापोच सेवा सुरु केली आहे.- शरद सराफ, संचालक, इण्डेन गॅस एजंन्सी.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस