शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्राला बसला 30 टक्क्यांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 5:00 AM

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ झाली. यामुळेच लोखंडाचे तसेच विविध बांधकाम साहित्यांच्या दरात वाढ झाल्याने घराचे स्वप्न महागले आहे. डिझेल आणि कोळशाच्या भाववाढीचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. पेट्रोल व डिझेलचे दर सध्या आकाशालाच भिडले आहेत. पेट्रोल ११३.७९ तर डिझेल १०३.१२ रुपये प्रतिलीटरच्या घरात आहे. पूर्वी विटांचा दर प्रतिहजार  चार हजारांच्या घरात होता तो आता प्रतिहजार सहा हजारांवर पोहोचला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आपलेही चांगले आणि मजबूत घर असावे, अशी इच्छा प्रत्येक व्यक्ती बाळगतो. त्यामुळेच शासकीय स्तरावर घरकुल योजनेच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्नही होत आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून पेट्रोलडिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच दरवाढीचा परिणाम लोहा-सिमेंटच्या दरावर झाला असून, जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रावर याचा तब्बल ३० टक्क्यांनी परिणाम झाल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ झाली. यामुळेच लोखंडाचे तसेच विविध बांधकाम साहित्यांच्या दरात वाढ झाल्याने घराचे स्वप्न महागले आहे. डिझेल आणि कोळशाच्या भाववाढीचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. पेट्रोल व डिझेलचे दर सध्या आकाशालाच भिडले आहेत. पेट्रोल ११३.७९ तर डिझेल १०३.१२ रुपये प्रतिलीटरच्या घरात आहे. पूर्वी विटांचा दर प्रतिहजार  चार हजारांच्या घरात होता तो आता प्रतिहजार सहा हजारांवर पोहोचला आहे. घर बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडाच्या दरातही मोठी तेजी आली आहे. 

सिमेंट ८० रूपयांनी महागले

सिमेंट तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या दरावर डिझेल दरवाढीचा परिणाम झाला. विविध कच्च्या मालांच्या दरात वाढ झाल्याने उत्पादन खर्च वाढला. शिवाय सिमेंटच्या वाहतूक खर्चातही वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात सिमेंटची बॅग ३०० ते ३३० रुपयांच्या घरात होती, ती आता ३९० ते ४१० रुपये झाली आहे. 

लोखंडही महागले-    घर बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात लोखंडाचा वापर केला जातो. पण पेट्रोल-डिझेल दरवाढीचा यावरही परिणाम झाला असून, ४ ऑक्टोबरपर्यंत ५१ रुपये किलो दर असलेले लोखंड आता ६३ रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. डिझेल व कोळशाचे वाढलेले दर आदींमुळे बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडाचे भाव वाढल्याचे सांगण्यात येते.

काचेचे दरही वधारले-  कोळशाचे खासगीकरण होताच याचे भाव चांगलेच वाढले. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च ३० टक्क्यांनी वाढला आहे. सध्याच्या विज्ञान युगात काचेचा वापर सर्वच क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात होत असून, घर आकर्षक दिसावे म्हणून काचेचा वापर केला जातो. पण पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे काचेचेही दर वधारले आहेत. 

फ्लॅटच्या दरात झाली वाढ-    डिझेलच्या दरवाढीचा विविध क्षेत्रांना चांगलाच फटका बसला आहे. बांधकाम क्षेत्रही यापासून सुटले नसून, घर बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरात वाढ झाली असून, घर बांधकाम महागले आहे. अशातच फ्लॅटच्या दरातही बऱ्यापैकी वाढ झाली आहे.

डिझेलच्या दरवाढीमुळे बांधकाम क्षेत्राला ३० टक्क्यांचा फटका बसला आहे. इतकेच नव्हे तर विविध साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. सिमेंटची वाहतूक करणाऱ्यांनी छत्तीसगड परिसरात २५ टक्के तर चंद्रपूर परिसरात १९ टक्के वाहतूक खर्च वाढवला आहे. शिवाय सिमेंटच्या दरात ६० ते ८० रुपयांनी वाढ झाली आहे.- राजेश पडोळे, सिमेंट व लोहा विक्रेता, वर्धा.

डिझेलच्या दरवाढीचा परिणाम  एक-दोन साहित्यांवर नव्हे तर दैनंदिन वापरातील सर्वच वस्तूंवर झाला आहे. वाहतूक खर्चात वाढ झाली असून, ४ ऑक्टोबरपर्यंत लोखंडाचे दर ५१ रुपये होते ते आता ६३ रुपये प्रति किलाे झाले आहेत.- अजहर शेख, लोखंड विक्रेता, देवळी.

शासकीय कामांचे इस्टिमेट जुने आहे. त्याच्या तुलनेत डिझेलच्या दरवाढीनंतर विविध साहित्याची झालेली भाववाढ अडचणीत भर टाकणारीच आहे. जुन्या इस्टिमेटनुसार शासकीय कामे पूर्ण कशी करावी, हा आमच्यासमोरील मोठा प्रश्न आहे. सध्या मजुरांची मजुरी, सिमेंट, लोखंड आदींच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे.- प्रमोद पाटील, कंत्राटदार, चिकणी.

 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल