शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

काँग्रेसने साजरा केला नोटाबंदीचा द्वितीय स्मृतीदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 8:51 PM

मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेस व युवक काँग्रेसतर्फे स्टेट बँक समोर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव शेखर शेंडे यांच्या नेतृत्वात निदर्शने करून निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देशेखर शेंडे : केंद्राच्या निर्णयामुळे उद्योगधंदे बंद पडले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेस व युवक काँग्रेसतर्फे स्टेट बँक समोर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव शेखर शेंडे यांच्या नेतृत्वात निदर्शने करून निषेध करण्यात आला. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुघलकी आदेश काढून नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला व त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले. नोटाबंदीमुळे सामान्य जनता व छोटे-मध्यम व्यापारी त्रस्त झाले आहे. नोटाबंदीमुळे बरेच उद्योग बंद पडले. शेकडो कामगार व कर्मचारी बेरोजगार झाले. नवीन उद्योग नावापुरते समोर आले आहे. नरेंद्र मोदी यांच्या या नोटाबंदीचा निर्णय पुर्णपणे चुकीचा असून त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले आहे. आज दोन वर्षानंतरही समाजातील प्रत्येक घटक मग तो ज्येष्ठ, तरूण असो किंवा महिला असो हे सर्व आज संकटाचा सामना करीत आहे.नोटाबंदी हा मोठा कट असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुट-बुटातील मित्रांचा काळा पैसा रूपांतरीत करण्याची छुपी योजना होती. सरकारने किती ही लपविण्याचा प्रयत्न केला तरी त्याबद्दलचे सत्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे पुढील दिवाळी मोदीमुक्त करावी, असा संकल्प जनतेनी घ्यावा, असे आवाहन शेखर शेंडे यांनी केले.आंदोलनात माजी सचिव प्रवीण हिवरे, शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजेंद्र शर्मा, इकराम हुसैन, वर्धा जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष गौरव देशमुख, नगरसेवक निलेश खोंड, परवेज खान, दिनेश पाटील, निळकंठ पिसे, फिरोज खान, पंकज काकडे, गुड्डू तेलरांधे, अर्शी मलिक, नितीन इंगळे, जिल्हा महासचिव आबिद शेख, वर्धा विधानसभा अध्यक्ष कुणाल भाकरे, एन.एस.यु.आय. जिल्हा उपाध्यक्ष वैभव तेलरांधे, पल्लवी खामणकर, मंगेश काळे, आदित्य खुणकर, राहुल मेहेर, निखिल देशमुख, रवी कडू, चेतन कडू, विपीन सोनोने आदी काँग्रेस व युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Note Banनोटाबंदी