शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

तडजोड हा यशस्वी जीवनाचा अनिवार्य भाग

By admin | Updated: December 13, 2015 02:17 IST

यशस्वी जीवनासाठी तडजोड अत्यंत महत्त्वाची आहे. तडजोडीचे समायोजन आपल्या दैनंदिन जीवनात करणारी व्यक्ती कधीही अपयशी ठरत नाही.

सुशील गावंडे : विद्यार्थी मार्गदर्शन विभागाद्वारे ‘समायोजन कौशल्य’ विषयावर चर्चासत्रवर्धा : यशस्वी जीवनासाठी तडजोड अत्यंत महत्त्वाची आहे. तडजोडीचे समायोजन आपल्या दैनंदिन जीवनात करणारी व्यक्ती कधीही अपयशी ठरत नाही. सर्वांना सामावून घेण्याची ही वृत्ती म्हणजे भारतीय संस्कृतीचीच देण आहे. यशाचे शिखर गाठण्यास ती पदोपदी उपयुक्त ठरणारी आहे, असे प्रतिपादन लता मंगेशकर महाविद्यालय व रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुशील गावंडे यांनी केले. दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या विद्यार्थी मार्गदर्शन विभागाद्वारे आयोजित ‘समायोजन कौशल्य’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालयात आयोजित या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. श्याम भुतडा तर अतिथी म्हणून उपअधिष्ठाता डॉ. केएसआर प्रसाद, विद्यार्थी मार्गदर्शन विभागाचे संचालक डॉ. राजेश झा, आयोजन समिती अध्यक्ष मानसशास्त्रज्ञ रुपाली सरोदे, कार्यक्रम समन्वयक डॉ. गौरव सावरकर उपस्थित होते. या सत्रात डॉ. गावंडे यांनी समाजीकरण व असमाजीकरण यातील फरक समायोजनाच्या अनुषंगाने स्पष्ट केला. एखादी घटना घडणे (फार्मिंग), घटनेच्या परिणामाला सामोरे जाणे(स्टॉर्मिंग), घटनेशी साम्यावस्था निर्माण होणे(नॉर्मिंग) आणि समायोजन घडणे(अ‍ॅडजॉर्निंग), अशा टप्प्यांच्या सहाय्याने विषयाची मांडळी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी अभ्यास आणि मैत्री या विषयावरही मनमोकळा संवाद साधला. शंकांचे निरसनही केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतिथींचा परिचय डॉ. राजेश झा यांनी करून दिला. संचालन मिथिला पानसे यांनी केले. आभार रुपाली सरोदे यांनी मानले. या कार्यशाळेत आयुर्वेद अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी)