शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

कामचुकार सरकारी अधिकाऱ्यांची तक्रार करणे झाले सोपे; कार्यालयात नागरिकासाठी कुलूपबंद अभिप्राय पेटी ठेवणे बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 20:21 IST

शासकीय कार्यालयात दिसणार कुलूपबंद पेटी : जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धडकले आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयात प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, लोककल्याणकारी व उत्तरदायित्व करण्याच्या दृष्टीने नागरिक अभिप्राय यंत्रणा प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

त्याअनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने आदेश जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्वच विभागात धडकले आहेत. अर्थातच अभिप्राय पेटीच्या निर्णयामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात कामासाठी आलेल्या अभ्यागतांना सन्मानाची वागणूक देण्यासह चोख कर्तव्य बजावे लागणार आहेत. प्रत्येक शासकीय कार्यालयात नागरिकासाठी कुलूपबंद अभिप्राय पेटी ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

कार्यालयास भेट देणारे नागरिक तसेच अधिकारी-कर्मचारी, कार्यालयीन स्वच्छता, सेवा देण्याची पद्धत, वर्तणूक, कामकाजातील सुलभता किंवा विलंब याबाबत १ ते ५ गुणांमध्ये तसेच मुक्त स्वरूपात आपले अनुभव मांडू शकतील, यासाठी शासनाने विहित नमुन्यातील अभिप्राय प्रारूप उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत, तसेच अभिप्राय पेटी दरमहा ५ तारखेला कार्यालय प्रमुखांच्या उपस्थितीत उघडण्यात येणार असून प्राप्त झालेल्या सूचनांचे संकलन व परीक्षण योग्यरीत्या केले जाईल.

कार्यालयाच्या स्तरावर तात्काळ अमलात आणता येणाऱ्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात येईल, तर धोरणात्मक बदल असलेले, आवश्यक असलेले अभिप्राय वरिष्ठ स्तरावर पाठविले जातील. या उपक्रमामुळे शासकीय कामकाजात गतिमानता व पारदर्शकता वाढून शासन व नागरिकांमधील विश्वास दृढ होईल, असा शासनाचा विश्वास आहे. शासकीय कार्यालयास भेट देणाऱ्या अभ्यागतांना अभिप्रायासाठी फार्म ठेवण्याबाबत सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये व स्थानिक स्वराज्य संस्था यांना सूचना दिल्या आहेत.

नागरिक असा नोंदवू शकतात, आपला अभिप्राय

कार्यालयास भेट देणाऱ्या अभ्यागताबरोबरच त्या कार्यालयाच्या आस्थापनेतील अधिकारी व कर्मचारीसुद्धा शासन अधिकाअधिक लोकाभिमुख कसे होऊ शकेल, तसेच विकासात्मक व प्रशासकीय दृष्टीने शासकीय योजनामध्ये कोणते बदल काळानुरूप आवश्यक आहेत, याबाबत आपले अभिप्राय या यंत्रणेद्वारे देऊ शकतील.

कर्मचाऱ्यांनमध्ये वाढणार धाकधूक

शासनाने अभिप्राय पेटी बसविण्याचे आदेश काढल्याने कामचुकार व जनतेची कामे न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चांगलीच धाकधूक वाढली आहे. एकंदरीत आता कर्मचाऱ्यांना प्रशासनात चोख व अधिक कार्यक्षम राहावे लागणार आहेत, हेही आता तेवढेच खरे ठरणार आहे.

"शासनाच्या प्रत्येक योजना जनतेच्या हितासाठी असतात. त्या जनतेपर्यंत पोहोचविणे अधिकारी आणि कर्मचारी यांचे प्रशासकीय कर्तव्य असते. शासन व प्रशासकीय यंत्रणा यांच्यामध्ये सुवर्णमध्य साधण्यासाठी अभिप्राय पेटीच्या माध्यमातून महाराष्ट्रसरकारने जनतेला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले आहेत. त्यामुळे कर्मचारीसुद्धा जनतेच्या कामाला प्राधान्य देतील."- मिलिंद सालोटकर, सचिव, मुख्याध्यापक संघ, वर्धा.

"अनेक कार्यालयांमध्ये सूचना पेटी किंवा तक्रार पेटी ठेवण्याची पद्धत पूर्वीपासून अस्तित्वात आहेत. तथापि या व्यवस्थेचे स्वरूप तक्रारीपुरते मर्यादित आहे. सदरहू व्यवस्थेचा प्रशासकीय सुधारणांच्या दृष्टिकोनातून, पुनरीक्षण, पुनवरालोकन कार्यालयाच्या कामकाजाबाबत सुधारणेच्या दृष्टीने योग्य तो उपयोग होत नाही, असे शासनाला दिसून आले! शासन व प्रशासनात योग्य ताळमेळ आणि गतिमानता येण्यासाठी, अभिप्राय पेटीचा निर्णय शासनाने घेतल्याबद्दल शासनाचे अभिनंदन करतो."- अविनाश टाके, सामाजिक कार्यकर्ते.

English
हिंदी सारांश
Web Title : Easy complaint process for negligent officers; feedback box mandatory.

Web Summary : Government mandates feedback boxes in offices for citizen input on services, staff behavior, and efficiency. This aims to boost transparency, address grievances, and improve public service delivery, fostering trust between citizens and administration. Action will be taken on feedback.
टॅग्स :GovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्र