शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे पिकांबाबत तक्रार निवारणासाठी समिती

By admin | Updated: May 15, 2014 01:40 IST

कापूस बियाणे व पिकांच्या संबंधात सर्व तक्रारीचे निवारण करण्याकरिता जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने समिती स्थापन केली आहे.

वर्धा : कापूस बियाणे व पिकांच्या संबंधात सर्व तक्रारीचे निवारण करण्याकरिता जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने समिती स्थापन केली आहे. शेतकर्‍यांनी तक्रार असल्यास जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी विकास अधिकारी आर. के. गायकवाड यांनी केले आहे.बियाणे, खते, कीटकनाशक या निविष्ठा दज्रेदार नसल्यास व भेसळ असल्यास तसेच बियाणे उगवणीबाबत तक्रारीकरिता उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती शासनाने स्थापन केलेली आहे. तक्रार असल्यास शेतकर्‍यांनी पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी या कार्यालयात लेखी तक्रार नोंदवावयाची आहे.कृषी निविष्ठांविषयी असलेल्या अडचणी, तक्रारी सोडविण्यासाठी किंवा मार्गदर्शनासाठी कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांक १८00२३३४000 देण्यात आला आहे.बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके खरेदी करताना शेतकर्‍यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणार्‍या अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदीस प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. बनावट किंवा भेसळयुक्त बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशक खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून पावतीसह निविष्ठा खरेदी करावे, विना पावतीने कोणतीही निविष्ठा खरेदी करू नये. खरेदी केलेल्या बियाणाचे वेष्टन किंवा पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणेची पाकिटे सिलबंद किंवा मोहरबंद असल्याची खात्री करावी, बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरची अंतिम मुदत पाहून घ्या. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किमंतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषीविभागाने केले आहे.(शहर प्रतिनिधी)