शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुलगावच्या पंचधारा मार्गावरील नालीची साफसफाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 05:00 IST

पुलगाव येथील बढे प्लॉट परिसरात असलेल्या पंचधारा रस्त्यालगत सांडपाणी वाहून नेणारी नाली आहे. सदर नालीची मागील सहा ते सात वर्षांपासून साफसफाई न केल्याने नालीत घाण साचली आहे. नालीतील पाण्यात किडे, अळ्या पडल्या असून सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. नालीला लागुनच डॉ. बोरटकर, डॉ. बागडे यांच्यासह अनेक नागरिकांची घरे आहेत.

ठळक मुद्देबढे प्लॉट परिसरातील नागरिकांची मागणी । निधीअभावी रखडले काम

लोकमत न्यूज नेटवर्कनाचणगाव : सर्वत्र कोरोना आजाराने थैमान घातले असताना प्रशासनाकडून स्वच्छता पाळण्याबाबतचे आदेश निर्गमीत केले आहे. पण, पुलगाव येथील बढे प्लॉट परिसरातील पंचधारा मार्गावर असलेल्या नालीची मागील अनेक वर्षांपासून साफसफाईच केल्या गेली नसल्याने नालीतून गटारगंगा वाहत आहे. लगतच्या काही घरमालकांनी ही बाब न.प. प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यावरही नगरसेवकांकडून दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.पुलगाव येथील बढे प्लॉट परिसरात असलेल्या पंचधारा रस्त्यालगत सांडपाणी वाहून नेणारी नाली आहे. सदर नालीची मागील सहा ते सात वर्षांपासून साफसफाई न केल्याने नालीत घाण साचली आहे. नालीतील पाण्यात किडे, अळ्या पडल्या असून सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. नालीला लागुनच डॉ. बोरटकर, डॉ. बागडे यांच्यासह अनेक नागरिकांची घरे आहेत. परिसरात नेहमी दुर्गंधी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काहींनी तर नालीवर अतिक्रमण करीत नाली बुजवून त्यावर पक्के बांधकाम केले आहे. त्यामुळे नालीतून पाणी व कचरा वाहून जात नाही. परिणामी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.याबाबत नगरसेवकासह नगर पालिका प्रशासनाला ही गंभीर बाब निदर्शनास आणून देत नालीची स्वच्छता करण्याची मागणी केली असता तुम्हीच नाली बुजवून टाका, असा उलट सल्ला त्यांच्याकडून देण्यात आला. नगरपालिका प्रशासनाने नालीवरील सर्व अतिक्रमणे काढून नाली स्वच्छ करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.आरोग्याचा धोकानालीतील कचरा व पाणी वाहून जात नसल्याने सुटलेल्या दुर्गंधीने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.