शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांच्या धुमाकुळामुळे नागरिकांमध्ये दहशत

By admin | Updated: May 19, 2014 23:49 IST

शहरात काही दिवसांपासून चोरट्यांच्या टोळीने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे़ दररोज रात्री चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांत दहशत पसरली आहे;

पुलगाव : शहरात काही दिवसांपासून चोरट्यांच्या टोळीने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे़ दररोज रात्री चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांत दहशत पसरली आहे; पण पोलीस प्रशासन अगदी हातावर हात देऊन गप्प बसली आहे़ याबाबत तक्रार दाखल करण्यास गेलेल्यांनाच नको ते प्रश्न विचारून नाहक त्रास दिला जात असल्याने पोलीस प्रशासनाविरूद्ध असंतोष पसरला आहे. एक आठवड्यापूर्वी आर्वी रोडवरील रेल्वे गेटजवळील हॉटेलमधून गॅस सिलिंडर, कढई, झारे, गंज व अन्य साहित्य चोरट्यांनी लंपास केले़ शेतातील विहिरीवरील मोटार पंप, स्पिंकलर पाईप, विद्युत तार, स्प्रे-पंप चोरून नेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत़ सितारा होंडा पॉर्इंट वल्लभनगर येथील सिमेंट काँक्रीटमध्ये मजबूत बसविलेली मशीन, मोटर व लोखंडी भंगार साहित्य असा एकूण ५ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. शेतात पिकाचा हंगाम नसल्याने उन्हाळवाही करून शेतकरी घरी परत येतात. नेमका याचाच फायदा चोरटे घेत आहेत़ चोरीच्या घटना सातत्याने वाढत असून पोलीस गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप होत आहे़ घटनांची माहिती देण्यासही टाळाटाळ केली जात आहे़ लेखी तक्रार घेऊन जाणार्‍यास तुमचा रिपोर्ट बरोबर लिहिला नाही. शेतातील साहित्य कुणाच्या भरवशावर ठेवले होते. चोरी कुणी केली. तुमचा संशय कुणावर आहे. चोरी गेलेल्या वस्तुची किंमत तेवढी होती की नाही, ती वस्तू जुनी व भंगार होती काय, कमी रक्कम लिहा, डबल रिपोर्ट लिहा, असे प्रश्न विचारून तक्रारकर्त्यास ताटकळत ठेवले जाते़ तक्रारीची सत्यप्रत देण्यास टाळाटाळ केली जाते़ या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत़ पोलीस प्रशासनाने अवैध दारू, रेती माफिया, गुंड, चोरटे, चोरीच्या वस्तू खरेदी करणारे भंगार व्यावसायिक यांच्या साखळीचा शोध लावून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)