चालकाच्या प्रसंगावधानाने बचावले चिमुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:12 IST2018-11-29T00:12:18+5:302018-11-29T00:12:51+5:30

शाळेतील विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या आॅटोच्या पुढील चाकाचा रॉड तुटल्याने आॅटो दुभाजकाला धडकला. लगेच प्रसंगावधान राखून आॅटो नियंत्रीत केल्याने चिमुकले सुखरुप बचावले. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास ठाकरे मार्केट समोर झाला.

Chimuklea survived the driver's fate | चालकाच्या प्रसंगावधानाने बचावले चिमुकले

चालकाच्या प्रसंगावधानाने बचावले चिमुकले

ठळक मुद्देठाकरे मार्केट परिसरातील घटना : आॅटोचे पुढील चाक पळाले

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शाळेतील विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या आॅटोच्या पुढील चाकाचा रॉड तुटल्याने आॅटो दुभाजकाला धडकला. लगेच प्रसंगावधान राखून आॅटो नियंत्रीत केल्याने चिमुकले सुखरुप बचावले. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास ठाकरे मार्केट समोर झाला.
शहरातील अग्रगामी विद्यालयात शिकणाऱ्या आठ ते नऊ चिकुल्यांना घेऊन एम.एच.३२ बी.६३९९ क्रमांकाचा आॅटो ठाकरे मार्केटकडे येत होता.दरम्यान आॅटोच्या पुढील चाकाचा रॉड तुटल्याने आॅटो दुभाजकाला धडकला. आॅटो चालकाने लगेच बाजू सावरुन विद्यार्थ्यांना बाहेर काढले. हा अपघात बघताच नागरिकही धावून आले. यात आॅटो चालकाच्या डोक्याला मार लागला असून चिमुकले सुखरुप बचावले. लगेच पालकांना फोन करुन माहिती देण्यात आली. काही चिमुकल्यांना पालकांनी घरी नेले तर काहींना दुसऱ्या आॅटोच्या सहाय्याने घरी पाठविण्यात आले.

Web Title: Chimuklea survived the driver's fate