शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

‘चाईल्ड लाईन’ने रोखला वर्ध्यात हाेणारा बालविवाह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 5:00 AM

सभागृह चालकाला विवाह सोहळ्यासाठी सभागृह देताना वर आणि वधू या दोघांचे आधार कार्ड, वयाचा दाखला घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. असे न केल्यास सभागृहचालक, केटरिंगचालक, फोटोग्राफर आदींवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याच्या सूचना यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिल्या.

ठळक मुद्देवधू-वर पक्षाकडील मंडळींची कानउघाडणी : कायद्याची दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या संकटात जिल्ह्यातील ग्रामीण भागात बालविवाह करण्याच्या घटना उघडकीस आल्या. मात्र, आता चक्क शहरातही याचे लोण पसरत चालले असून, वर्ध्यातील पावडे चौक परिसरात असलेल्या शाळेसमोरील सभागृहात पार पडणारा बालविवाह चाईल्ड लाईनच्या पुढाकाराने रोखण्यात यश आले आहे. वर्ध्यातील रहिवासी २५ वर्षीय युवकाचे नागपूर जिल्ह्यातील एका गावातील १६ वर्षीय मुलीशी विवाह सोहळा होत असल्याची माहिती चाईल्ड लाईनच्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर मिळाली. चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक आशिष मोडक यांनी तत्काळ आपल्या चमूसह बॅचलर रोडवर असलेल्या मंगल कार्यालयात धडक दिली. दरम्यान, तेथे विवाह सोहळा सुरू असल्याचे त्यांना समजले. त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कार्यालय आणि बाल कल्याण समितीला दिली. रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनाजी जळक यांच्या मदतीने सर्व पदाधिकारी सभागृहात पोहोचले. त्यांनी वर आणि वधू पक्षाकडील दोन्ही नातलगांची समजूत काढली. बालविवाह करणे हा बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार गुन्हा ठरत असल्याचे समजावून सांगितले. यावेळी अधिकाऱ्यांनी मुलीकडून जबाबनामा लिहून घेत वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नाही, असे लिहून घेण्यात आले. यावेळी चाईल्ड लाईनच्या  सामाजिक कार्यकर्त्या जयश्री निवल, माधुरी शंभरकर, सूरज वानखेडे, आशिष हिरुळकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर तसेच रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनाजी जळकसह कर्मचाऱ्यांची   उपस्थिती होती. सध्या मुलीला बालकल्याण समितीपुढे हजर करून तिच्या पुनर्वसनाची कारवाई करण्यात येत आहे.

सभागृहचालकाला दिल्या मौखिक सूचना - यावेळी सभागृह चालकाला विवाह सोहळ्यासाठी सभागृह देताना वर आणि वधू या दोघांचे आधार कार्ड, वयाचा दाखला घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. असे न केल्यास सभागृहचालक, केटरिंगचालक, फोटोग्राफर आदींवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याच्या सूचना यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिल्या.

जन्म दाखल्यावरून कळले मुलीचे वय 

- बॅचलर रोडवर असलेल्या सभागृहात बालविवाह पार पडत असल्याचे समजताच चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक आशिष मोडक यांनी सभागृहात धाव घेत लग्नसोहळ्याची पत्रिका प्राप्त केली. दरम्यान, मुलगी कोणत्या शाळेत शिकत होती, याची माहिती घेऊन तेथील शाळेशी संपर्क करून मुलीच्या जन्माचा दाखला प्राप्त करण्यात आला. दरम्यान, दाखल्यात मुलीचे वय अवघे १६ वर्षे असल्याचे समजले. त्यानंतरच हा बालविवाह रोखण्यात आला. 

 

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिस