शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खताची दरवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 21:46 IST

डिझेल अन् पेट्रोलच्या दरवाढीमुळे महागाईने कळस गाठला. याचा परिणाम रासायनिक खतांच्या किंमतीत झाल्याचे दिसत आहे. या दरवाढीने शेतकऱ्यांची कंबर मोडल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देबॅगमागे वाढले १०० ते १२५ रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : डिझेल अन् पेट्रोलच्या दरवाढीमुळे महागाईने कळस गाठला. याचा परिणाम रासायनिक खतांच्या किंमतीत झाल्याचे दिसत आहे. या दरवाढीने शेतकऱ्यांची कंबर मोडल्याचे दिसत आहे. एकीकडे रासायनिक खते निर्माण करणाऱ्या कंपन्यांवर सरकारचे नियंत्रण नसल्याने किंमती वाढविण्याची सुट मिळाली आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कृषी मालाचा उत्पादन खर्चावर भाव मिळत नसल्याने शेतकरी कंगाल होत आहे. याचा विचार शासनाने करण्याची मागणी होत आहे.खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी पेरणी पूर्व मशागत करण्यात व्यस्त आहे. शेतीच्या कामात बैलजोडीचा वापर कमी झाला. शेतीची बहुतेक कामे ट्रॅक्टर व तांत्रिक माध्यमातूनच होत आहे. त्यासाठी लागणाऱ्या इंधनाचे भाव सातत्याने वाढतच आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ झाली असताना रासायनिक खताच्या भरमसाठ दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे खरीपासाठी बियाणे व खताचे नियोजन बिघडले आहे.मागील खरीपात डीएपी ५० किलो बॅग १,१६० रुपयांची होती, ती आता १,२५० रुपयांची झाली आहे. तर १०.२६.२६ खत १,०५५ रुपयात मिळायचे ते आता १,१६० रुपयांत मिळत आहे. डिझेल व खताचे भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणी खर्चात मोठी वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खताच्या दरात व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गत पाच वर्षांपूर्वीच्या दराच्या तुलनेत आजच्या दरात दुप्पटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. गत एका वर्षात खताचे दर आठ वेळा वाढल्यचे दिसून येते.गतवर्षी रासायनिक खतांच्या किंमती दुप्पटीने वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चातही दुप्पट वाढ झाली; परंतु शेतमालाच्या किंमती व तुलनेत वाढल्या तर नाहीच उलट ७० टक्क्यांपर्यंत खाली आल्या. उत्पादन खर्चानुसार किंमती आकारण्याची मुभा असल्यामुळे कंपन्या मालामाल होत आहे. तर शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याच्या वल्गणा करण्याऱ्या सरकारच्या राज्यात शेतकऱ्यांच्या मात्र उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के कमी भावाने विकल्या जात आहे. म्हणूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी न होता वाढतच आहे, हे विसरून चालणार नाही. यामुळे पेरणी करावी अथवा नाही या बाबात शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाल्याचे दिसत आहे.शेतकऱ्यांचे पेरणीचे नियोजन कोलमडलेलोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : गत चार ते पाच वर्षांपासून शेतकरी दुष्काळी परिस्थितीशी झटत आहे. शेतीत निघणारे अल्प उत्पादन व कमी भाव यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. एकीकडे शासन शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपट वाढविण्याचा दावा करीत आहे. तर दुसरीकडे खताचे श्राव गोणीमागे १०० ते १२५ रुपयांनी वाढले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे पेरणीचे नियोजन पुरते बिघडले आहे.खरीप हंगाम जवळ आला असून यंदा हवामान खात्याने देखील पावसाचा अंदाज लवकरच वर्तविला आहे. यामुळे शेतकरी शेती कामात व्यस्त आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांची खते-बी-बियाण्याचे नियोजन सुरू केले आहे; मात्र खताच्या मोठ्या प्रमाणात दरवाढीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. मागील वर्षात खताच्या दरवाढ करण्यात आली आहे. मागील वर्षात खताच्या किंमतीत दुपटीने वाढून शेतकऱ्यांच्या उत्पन्न खर्चातही दुप्पट वाढ झाली होती. परंतु शेतमालाचे भाव ७० टक्क्यांपर्यंत खाली आल्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी नुकसान सोसावे लागले.दरवर्षी नियोजन करून खरीपाची पेरणी केली जाते. त्यात निसर्गही वेळोवेळी दगा देत असल्यामुळे अपेक्षित उत्पन्न हातात येत नाही. जे काही उत्पन्न हातात पडते. त्यालाही बाजारात मातीमोल भाव मिळतो. त्यामुळे शेतीवर खर्च अधिक व उत्पादन कमी अशी अवस्था वर्धा तालुक्यातील शेतकऱ्यांची होते. यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणे गरजेचे आहे.- देविदास सातपुते, शेतकरी नेरी (मिरापूर)

टॅग्स :Farmerशेतकरी