कारचा झाला चेंदामेंदा; पुलगावाजवळ भीषण अपघातात तीन ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 14:10 IST2021-01-26T14:10:05+5:302021-01-26T14:10:28+5:30
Big Accident : पुलगाव येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले

कारचा झाला चेंदामेंदा; पुलगावाजवळ भीषण अपघातात तीन ठार
वर्धा : मंगळवारी पहाटे पुलगाव नजीकच्या मलकापूर शिवारात नेक्सा कंपनीची बोलेनो कार क्रमांक MH-40 BE 8394 गाडीने उभ्या ट्रकवर धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला.
या अपघातात दिलीप वामनराव इंगोले, सुरेखा दिलीप इंगोले, दीपक चैतराम मुंजेवार हे ठार झाले. अपघातग्रस्त गाडी ही शेगाववरुन नागपूरला जात होती व मुलगी गाडी चालवित होती. अपघातात तिच्या आई वडिलांचा दुर्देवी मृत्यू झाला हे सर्व नागपुरमधील हिंगणा परिसरातील रहिवाशी होते. पुलगाव येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
पुलगाव येथे झालेल्या भीषण अपघातात कारचालक हेमंती दीपक मुंजेवार वय 39 वर्षे तिने निष्काळजीपणे वाहन चालवून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रक क्रमांक एम एच 27 एक्स 24 01 धडक मारली या अपघातात हेमंतीचे पती दीपकसह आई वडील सुरेखा आणि दिलीप इंगोले घटनास्थळीच ठार झाले. पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नारळ वार व डॉक्टर टेकाम यांनी शवविच्छेदन केले. या अपघातात मुलगा तेजस मुंजेवार वय 14 वर्षे व मुलगी केजल मुंजेवार हे थोडक्यात बचावले. पोलिसांनी कार चालक हेमंती मुंजेवार तिच्यावर कलम 279 /304अ/ भादंवि तसेच सहकलम 184 मोटर वाहन कायदा दाखल करण्यात आले पुढील तपास पुलगाव पोलिस करीत आहे
सर्वजण राय टाउन हिंगणा नागपूर येथील रहिवासी होते आज सायंकाळी सहा वाजता डिगडोह महिंद्रा कंपनीच्या मागे हिंगणा येथील स्मशानभूमीत सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.