शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

क्षमता १५०० ची, प्रत्यक्ष लाभ २५० हेक्टरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 23:44 IST

परिसरातील शेतकऱ्यांना हिरवे स्वप्न दाखवून शेती संपादित करण्यात आली. अवघ्या काही वर्षांच्या कालावधीत धरणही उभे झाले. परंतु, पाहिजे त्या प्रमाणात सिंचनाची सोय झाली नाही. कालवे सदोष झाले नसते तर १५०० हेक्टर क्षेत्र लाभ क्षेत्रा खाली आले असते;....

ठळक मुद्देमदन उन्नई धरणाच्या कालव्यांना गळती

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : परिसरातील शेतकऱ्यांना हिरवे स्वप्न दाखवून शेती संपादित करण्यात आली. अवघ्या काही वर्षांच्या कालावधीत धरणही उभे झाले. परंतु, पाहिजे त्या प्रमाणात सिंचनाची सोय झाली नाही. कालवे सदोष झाले नसते तर १५०० हेक्टर क्षेत्र लाभ क्षेत्रा खाली आले असते; पण फुटलेल्या पाटचऱ्या, वाढलेली झुडपे तसेच कालव्यांना पडलेले तडे यामुळे प्रत्यक्षात २००-२५० हेक्टर शेती कशीबशी सिंचनाखाली आली असल्याचे बोलले जात आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.यावर्षी पाऊस समाधानकारक न झाल्याने मदन उन्नई धरणाची पाणी पातळी पाहिजे तशी वाढली नाही. अशात एक उद्योग कंपनी दिवसरात्र पाण्याचा उपसा करीत आहे. अशावेळी रबी पिकाला पाणी मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी ओरड होत असताना धरणातून पाणी सोडण्यात आले. सोडण्यात आलेल्या डाव्या-उजव्या कालव्याचे पाणी दैनावस्था झालेल्या कालव्यांमुळे जास्त अंतर कापू शकले नाही. सदर दोन्ही कालव्यांना अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेताला तळ्याचेच स्वरूप आले. इतकेच नव्हे तर आकोली-गिरोली मार्गावरील एसकेएफ गेटमधून पाण्याची संततधार सुरु आहे. त्याकडे संबंधित अधिकाऱ्याचे दुर्लक्ष होत आहे. तसेच क्षीरसमुद्र गावाजवळील धोंडीकर यांच्या शेतानजीक पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. यासह विविध करणांमुळे धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याने अतिशय अल्प अंतर कापले. शेतकऱ्यांनी मोठ्या धाडसाने यंदा रबी हंगामासाठी जमीन कसली आहे. परंतु, पाणीच शेतापर्यंत पोहोचले नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. यंदा रबी पिकांची लागवड कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना सध्या सतावत आहे. कोरड्या दुष्काळाचे सावट असलेल्या वर्धा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.टेबलवरूनच कालव्यांची पाहणीकालवा निरिक्षक कधीही कालव्याची पाहणी करीत नसल्याचे शेतकरी सांगतात. इतकेच नव्हे तर ते शेतकºयांशी साधा संवादही साधत नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवर शेतकऱ्यांसह नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याच धरणावर पथदिवे बसविले होते. परंतु, विद्युत देयक अदा न करण्यात आल्याने सदर पथदिवे सध्या बंदच आहेत. या प्रकरणी अधिकाºयांच्या बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरण