शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

विदर्भासह विदर्भाबाहेरील रुग्णांसाठी लोकाभिमुख ठरेल कॅन्सर हॉस्पिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2022 05:00 IST

डॉ. बोरले पुढे म्हणाले, कर्करोग या विषयाचा विचार केल्यास दक्षता म्हणून जागरूकता निर्माण करणे, लवकर निदान, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपचार, तसेच उपचारानंतर रुग्णाला माणुसकी जोपासत धीर देणे हे गरजेचे आहे. या नवीन कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून या चारही गोष्टींवर लक्ष केंद्रीत करून रुग्णसेवा दिली जाणार असल्याचे सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित सिद्धार्थ गुप्ता मेमोरिअल हॉस्पिटलचा श्रीगणेशा रविवार, १३ फेब्रुवारीला केंद्रीय रस्ते वाहतूक परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होत आहे. हे नवीन कॅन्सर हॉस्पिटल विदर्भासह विदर्भाबाहेरील रुग्णांसाठी लोकाभिमुख ठरेल, अशी माहिती कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांनी शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.डॉ. बोरले पुढे म्हणाले, कर्करोग या विषयाचा विचार केल्यास दक्षता म्हणून जागरूकता निर्माण करणे, लवकर निदान, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपचार, तसेच उपचारानंतर रुग्णाला माणुसकी जोपासत धीर देणे हे गरजेचे आहे. या नवीन कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून या चारही गोष्टींवर लक्ष केंद्रीत करून रुग्णसेवा दिली जाणार असल्याचे सांगितले.पत्रपरिषदेला विशेष कार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे, डॉ. संदीप श्रीवास्तव, डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, डॉ. ललित वाघमारे, डॉ. जॉर्ज फर्नांडिस, डॉ. नितीन भोला यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

प्रत्येक वर्षी जगात २ कोटी तर जिल्ह्यात दोन हजार नवे कर्क रुग्ण सापडतात : डॉ. संदीप श्रीवास्तव-    प्रत्येक वर्षी जगात २ कोटी नवीन कर्क रुग्ण सापडतात. त्यामुळे कर्करोगावरील वेळीच निदान व उपचार हे सध्याच्या विज्ञान युगात महत्त्वाचेच आहेत. वर्धा जिल्ह्याचा विचार केल्यास वर्धासारख्या छोट्या जिल्ह्यात वर्षाला किमान दोन हजार नवीन कर्क रुग्ण ट्रेस होतात. वर्ध्यासह विदर्भातील कर्क रुग्णांसाठी हे नवे रुग्णालय दिलासा देणारेच ठरणार असल्याचे डॉ. संदीप श्रीवास्तव यांनी सांगितले.कॅन्सर हॉस्पिटल १२० रुग्णखाटांचे : डॉ. नितीन भोला-    रविवारी श्रीगणेशा होत असलेले कॅन्सर हॉस्पिटल एकूण १२० खाटांचे आहे. यात ८० जनरल रुग्णखाटा असून या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये २४ तास वैद्यकीय सेवा देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर राहणार आह. शिवाय तीन अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष आहेत. शस्त्रक्रियेदरम्यान बहुधा रुग्णाच्या शरीरातील बेकार झालेला भाग कापावा लागतो. बहुधा प्लास्टिक सर्जरी करावी लागते. त्यामुळे या नवीन हॉस्पिटलमध्येच वेगळ्या प्लास्टिक सर्जरी कक्षही असल्याचे डॉ. नितीन भोला यांनी सांगितले.

महिनाभर राबविणार विशेष तपासणी शिबिर : अभ्युदय मेघे-    रविवारी श्रीगणेशा होणाऱ्या कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून दोन टप्प्यांत विशेष तपासणी शिबिर विदर्भातील सहा जिल्ह्यांत घेतले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यांत शिबिर घेतले जाणार असून, त्यामुळे वेळीच नवीन कर्क रुग्ण ट्रेस होत त्यांना वेळीच चांगला उपचार मिळणार असल्याचे याप्रसंगी अभ्युदय मेघे यांनी सांगितले.लोकार्पणास गडकरींसह यांची राहणार उपस्थितीनव्या सुसज्ज कॅन्सर हॉस्पिटलच्या लोकार्पणप्रसंगी नितीन गडकरी यांच्यासह कुलपती दत्ता मेघे, पालकमंत्री सुनील केदार, खा. रामदास तडस, आ. रणजित कांबळे, आ. समीर कुणावार, आ. दादाराव केचे, आ. पंकज भोयर, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, सागर मेघे, आ. समीर मेघे, डॉ. राजीव बोरले, डॉ. ललित वाघमारे, डॉ. संदीप श्रीवास्तव आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

टॅग्स :cancerकर्करोगhospitalहॉस्पिटल