शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

देवळी-नांदोरासह हिंगणी -बोरधरण मार्गावर नवीन पूल बांधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 06:00 IST

खा. रामदास तडस यांनी सर्व विभागांमध्ये समन्वय साधण्याकरिता समन्वय आढावा बैठक बोलावली होती. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. बैठकीला बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय मंत्री, शाखा अभियंता वाघमारे, राज्य परिवहन महामंडळाचे चेतन हासबनीस आदींची उपस्थिती होती.

ठळक मुद्देसमन्वय बैठकीत खासदारांच्या अधिकाऱ्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली असल्याने गावांना जोडणारे पूल व रस्ते अनेक ठिकाणी क्षतिग्रस्त झाले आहेत. या परिस्थितीमुळे बस फेऱ्या प्रभावित होवून विद्यार्थीवर्गाचेही नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देवळी तालुक्यातील देवळी-नांदोरा व सेलू तालुक्यातील हिंगणी-बोरधरण मार्गावरील पूल क्षतिग्रस्त झाल्याने नागरिकांची समस्या लक्षात घेता तेथे नवीन पूल बांधण्यात यावे, अशा सूचना खा. रामदास तडस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.खा. रामदास तडस यांनी सर्व विभागांमध्ये समन्वय साधण्याकरिता समन्वय आढावा बैठक बोलावली होती. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. बैठकीला बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय मंत्री, शाखा अभियंता वाघमारे, राज्य परिवहन महामंडळाचे चेतन हासबनीस आदींची उपस्थिती होती.देवळी-नांदोरा या प्रमुख जिल्हा मार्गावर उभा असलेला पूल क्षतिग्रस्त झाल्याने अनेक बसफेऱ्या प्रभावित होऊन विद्यार्थी वर्गाच्या दळण वळणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. विद्यार्थी वर्गाला त्रास होऊ नये म्हणून बसफेºया पर्यायी मार्गाने सोडण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.क्षतिग्रस्त झालेल्या पुलाच्या दुरूस्तीचे कार्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने सुरू झाले असून सुरक्षेचा उपाय म्हणून वाहतूक पूर्णत: बंद करून अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम २०१९ वर्षाच्या अर्थसंकल्पीय यादीत मंजूर झाले आहे. तांत्रिक बाबी व निविदा प्रक्रिया पूर्ण करून तात्काळ नवीन पुलाचे कार्य प्रारंभ करावे, अशा सूचना खासदार रामदास तडस यांनी दिल्या.सेलू तालुक्यातील बोरधरण-हिंगणी मार्गावरील बोरी कोकाटे गावाजवळील पूल क्षतिग्रस्त झाला आहे. त्याठिकाणी देखील तात्काळ नवीन पूल बांधकामाचे कार्य प्रारंभ करावे. जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण भरलेले आहे. येत्या काळात अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील पोलीस विभागाने सतर्क राहून सर्व विभागांनी समनव्यातून कार्य करावे, असे आवाहनही याप्रसंगी खा. रामदास तडस यांनी केले.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस